दिल्ली : देशातील सोने मार्केटमध्ये सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीची चमकही वाढली आहे. या व्यापार सप्ताहात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 466 रुपयांनी वाढला आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 3182 रुपयांची वाढ झाली आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (17-21 जानेवारी दरम्यान) 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा दर 48,112 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 48,608 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 61,759 रुपयांवरून 64,941 रुपये प्रति किलो झाली आहे.
IBJA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किंमती कर आणि मेकिंग शुल्काच्या आधीच्या आहेत. IBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 17 जानेवारी रोजी सोन्याचे दर 48,112 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. त्यानंतर काल 21 जानेवारी रोजी 48,608 रुपये प्रति 10 ग्रॅम असे सोन्याचे भाव आहेत. तसेच मागील आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 17 जानेवारी रोजी एक किलो चांदीचे भाव 60,351 रुपये होता तर काल 21 जानेवारी रोजी 64,941 प्रति किलो असा भाव होता.
सोने चांदी मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वर्षात सोन्याला मागणी आणखी वाढणार असून सोने 55 हजारांच्याही पुढे जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता चांदीच्या बाबतीतही असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022 आणि पुढील काही वर्षे चांदीच्या मागणीत मोठी तेजी दिसून येईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. सध्या या दोन्ही धातूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने 2022 च्या अर्थसंकल्पात वस्तू आणि सेवा कर (GST) दर 1.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची सरकारला विनंती केली आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पाआधीच्या शिफारशींमध्ये, GJC ने सोने, मौल्यवान धातू, रत्ने आणि अशा वस्तूंपासून बनवलेल्या दागिन्यांवर 1.25 टक्के GST ची मागणी केली आहे. सध्या रत्ने आणि दागिन्यांवर जीएसटीचा दर 3 टक्के आहे.
आज सोन्या-चांदीचे भाव वाढले की घटले..? ; सोने खरेदीआधी चेक करा काय आहेत नवीन दर