मुंबई : आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजार रुपयांच्या पुढे आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.
ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. सध्या देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. कोविड-19 च्या तिसर्या लाटेच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याबरोबरच गुंतवणूकदार पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. यामुळेच सोन्याच्या आयातीबरोबरच भौतिक सोने आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. तज्ज्ञही सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ सांगत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 ते 15 महिन्यांत सोन्याचा भाव 56,000 रुपयांचा सार्वकालिक टप्पा पार करेल. स्पॉट मार्केटमध्ये शुक्रवारी सोने 1,839 डॉलर प्रति औंसवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर कमी झाले असले तरी तज्ज्ञांचे मत आहे, की सोन्याचा एकूण दृष्टीकोन तेजीचा आहे आणि सोन्याच्या किंमतीतील कोणतीही घसरण ही नजीकच्या काळात खरेदीची मोठी संधी म्हणून पाहिली पाहिजे. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात झालेली घसरण ही नफा वसुली म्हणून पाहिली पाहिजे कारण या आठवड्यात सोन्यामध्ये मजबूत तेजी दिसून आली आहे.
या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालात तज्ज्ञांच्या हवाल्याने असे म्हटले आहे, की एकूण सोन्याच्या किमतीचा दृष्टीकोन सकारात्मक आहे आणि किमतीत कोणतीही घसरण गुंतवणूकदारांना खरेदीची चांगली संधी मानली पाहिजे. ते म्हणाले की, पुढील एक ते दोन महिन्यांत सोने 1900 डॉलर ते 1910 डॉलर प्रति औंस या पातळीवर जाऊ शकते, असा अंदाज आहे.
दुसर्या अहवालात, तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे, की पुढील 12 ते 15 महिन्यांमध्ये सोन्याची किंमत प्रति औंस 2000 डॉलर किंवा सुमारे 1,48,854 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, आता खरेदी केलेले सोने नंतर गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणार आहे. त्यात म्हटले आहे की, सोन्याची किंमत या तिमाहीत 1,915 डॉलर म्हणजेच 1,42,533.45 रुपयांच्या जवळपास पोहोचेल.
सोन्याच्या वापराच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. देशात सर्वाधिक सोने हे विदेशातून आयात केले जाते. एकूण सोन्याच्या आयातीपैकी 44 टक्के सोने फक्त दोन देशांकडून खरेदी केले जाते. गेल्या काही वर्षांतील कोणत्याही आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील सोन्याच्या आयातीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास 2014-15 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 339.3 टन सोने आयात करण्यात आले होते.
सोने-चांदी चमकले..! जाणून घ्या, सात दिवसात किती वाढलेत सोन्या-चांदीचे भाव..?