Gold Price : आज शुक्रवारी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किंमतीत (Gold Price) वाढ झाली आहे तर चांदीचे दर (Silver Price) मात्र कमी झाले आहेत. आज सोने 52 हजार 140 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 57 हजार 838 रुपये असे दर झाले आहेत. सोन्या चांदीचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. ibjarates.com नुसार 995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने 51 हजार 931 रुपये रुपयांना मिळत आहे. तर 916 शुद्धतेचे सोने 47 हजार 660 रुपयांना विक्री होत आहे.
सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price) कमी जास्त होत असतात. आज 999 शुद्धतेचे सोनं 101 रुपयांनी वाढले आहे. 995 शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय 916 शुद्धतेचे सोने आज 92 रुपयांनी वाढले आहे. त्याचवेळी 750 शुद्ध सोन्याच्या दरात आज 76 रुपयांनी वाढ झाली आहे. याशिवाय 585 शुद्धतेचे सोने आज 59 रुपयांनी वाढले आहे. त्याचबरोबर आज एक किलो चांदी 219 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
IBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत. मात्र, या वेबसाइटवर दिलेल्या दरामध्ये जीएसटीचा (GST) समावेश करण्यात आलेला नाही. सोने खरेदी आणि विक्री करताना तुम्ही IBJA दराचा संदर्भ घेऊ शकता. असोसिएशनच्या मते, IBJA देशभरातील 14 केंद्रांवरून सोन्या-चांदीचे सध्याचे दर घेते आणि त्याचे सरासरी मूल्य देते. सोन्या-चांदीचे सध्याचे दर किंवा त्याऐवजी स्पॉट किंमत वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न असू शकते, परंतु त्यांच्या किमतींमध्ये थोडा फरक आहे.
दरम्यान, कोरोना (Corona) काळात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी म्हणजेच ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले होते. हा त्यावेळी सोने दरातील एक विक्रम होता. त्यानंतर मात्र सोन्याचे दर कमी होत गेले. आज सोन्याचे दर पुन्हा 50 हजार रुपयांच्या टप्प्यात आले आहेत.