मुंबई : मागील अनेक दिवसांपासून होत असलेल्या जबरदस्त वाढीनंतर आज मात्र सोन्याला झटका बसला आहे. आज सोमवार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा जगभरात मोठा परिणाम होत आहे. रशिया – युक्रेनमधील युद्धामुळे जगभरातील आर्थिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणुकदार जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक टाळत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल वाढत चालला आहे.
आज जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कमी झाले आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत सोने मार्केटमध्ये दिसून येत आहे. आज येथेही सोन्याचे दर कमी झाले आहेत. आज 14 मार्च रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा वायदे भाव (Gold Price Today) 0.3 टक्क्यांच्या घरसणीसह 52,712 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. चांदीचे दरही 0.06 टक्क्यांनी कमी झाले (Silver Rate Today) असून 69,970 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आहे. मागील आठवड्यात सोने दर वाढून 55,558 रुपयांवर पोहोचला होता, जो ऑगस्ट 2020 मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक 56,200 रुपयांजवळ होता.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यात देशात सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून 45.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत सोन्याची आयात 26.11 अब्ज डॉलर इतकी होती. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर संकट आले असून सर्वच देश सोन्याची खरेदी जोरात करत आहेत. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड-बॅक्ड एक्स्चेंज-ट्रेड (ETF) SPDR गोल्ड ट्रस्टची सोन्याचा साठा वाढून 1,067.3 टन झाला, जो मार्च 2021 नंतरचा सर्वाधिक आहे. मात्र, भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता सोने खरेदी करावे, असेही सांगण्यात येत आहे.
युद्धामुळे अनेक गुंतवणुकदारांनी गोल्ड ETF मध्ये मोठी गुंतवणूक केली, त्यामुळे सोने दरात आणखी वाढ दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine conflict) वाढत्या तणावामुळे सोने दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोने लवकरच 60 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
अर्र.. युद्धाच्या संकटात देशाचा सोने साठा घटला.. पहा, कशामुळे घडलाय ‘हा’ परिणाम..?
Gold Price Today : आज सोन्या-चांदीचे मीटर डाऊन; सोने खरेदीआधी जाणून घ्या नवीन भाव..