मुंबई : जर तुम्ही आज दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्या-चांदीची नवीन किंमत जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण, आज मंगळवार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोन्या चांदीच्या किंमतीत बदल झाला आहे. कालप्रमाणेच आजही सोन्याचे भाव वाढले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत 0.8 टक्के वाढ झाली आहे. तर चांदीचेही दर वाढले आहेत.
आज सोने दर 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 48,605 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर आज चांदीचे दर 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 64,041 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आज मुंबई शहरात 24 कॅरेट सोन्याचा दर 49660 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 660 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. पुणे शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 320 रुपये तर 22 कॅरेटसाठी 46 हजार 780 रुपये, नाशिक शहरात 24 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार 320 रुपये तर 22 कॅरेटसाठी 46 हजार 780 रुपये आणि नागपूर शहरात 24 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 660 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 660 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. या चारही शहरात आज एक किलो चांदीचा दर 64 हजार 100 रुपये आहे.
आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजार रुपयांच्या पुढे आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.
ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. सध्या देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. कोविड-19 च्या तिसर्या लाटेच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याबरोबरच गुंतवणूकदार पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. यामुळेच सोन्याच्या आयातीबरोबरच भौतिक सोने आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. तज्ज्ञही सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ सांगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 ते 15 महिन्यांत सोन्याचा भाव 56,000 रुपयांचा सार्वकालिक टप्पा पार करेल.
पहिल्याच दिवशी सोन्याची किंमत वाढली; सोने खरेदीआधी चेक करा सोन्या-चांदीचे नवीन भाव