मुंबई : काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर कमी जास्त होताना दिसत आहेत. काल सोन्याचे दर कमी झाले होते. त्याआधी सोमवारी आणि मंगळवारी सोन्याचे दरात वाढ होती. आज तर सोन्याच्या दरात जबरदस्त वाढ झाली आहे. सोन्याने पुन्हा एकदा 48 हजारांचा टप्पा पार केला आहे. आज गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.20 टक्क्यांनी वाढला आहे. तर चांदीच्या दरातही 0.41 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
सध्या सोन्यास मागणी वाढली आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या बाबतीत सकारात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे भाव पुन्हा वाढले आहे. आज सकाळच्या टप्प्यातील हे भाव आहेत. दिवसभरात या दरात आणखी घट किंवा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोन्याचे दरात आज 0.20 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या सोने 48 हजार 293 रुपये प्रति दहा ग्रॅम असे भाव झाले आहेत. चांदीच्या दरात वाढ होऊन आज चांदीचे दर 62 हजार 440 रुपये प्रति किलो आहे.
दरम्यान, आगामी काळात सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण, वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. जर सरकारने आयात शुल्क कमी केले तर सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात.
सध्या ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे. या व्हेरिएंटचा परिणाम शेअर बाजारावर स्पष्ट दिसून येत आहे. या व्हेरिएंटच्या भीतीने शेअर बाजार कोसळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे सोन्याला मात्र या काळात मागणी वाढली आहे. देशाच्या सोने साठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत. आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सोने-चांदी बाजारभाव : आज सोने आणि चांदीचे मीटर डाऊन; ‘त्यामुळे’ कमी होताहेत भाव