मुंबई : नव्या वर्षात सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. सध्या कोरोनाच्या संकटात सोन्यास मागणी वाढली आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत सोने मार्केटमध्ये दिसून येत आहे. आज आठवड्यातील तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,900 रुपये इतका आहे. आज दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा आजचा भाव 49,830 रुपये आहे. मुंबईत आजचा चांदीचा भाव 64,200 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.
सध्याच्या काळात आर्थिक संकटे जास्त प्रमाणात असली तरी सोन्यास मागणी वाढली आहे. देशाच्या सोने आयातीतही वाढ झाली आहे. सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात (एप्रिल ते डिसेंबर 2021) दुपटीपेक्षा अधिक होऊन 38 अब्ज डॉलरवर पोहोचली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा आयातदार देश आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.
आज देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 830 रुपये तर 22 कॅरेटसाठी 45 हजार 900 रुपये असा भाव आहे. पुणे शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 910 रुपये तर 22 कॅरेटसाठी 45 हजार 760 रुपये, नाशिक शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 910 रुपये तर 22 कॅरेटसाठी 45 हजार 760 रुपये, नागपूर शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 830 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. या चारही शहरात चांदीचा भाव 64 हजार 200 रुपये प्रति किलो असा आहे. काल चांदीचा भाव 64 हजार 100 रुपये प्रति किलो होता.
दरम्यान, आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजार रुपयांच्या पुढे आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.
पहिल्याच दिवशी सोन्याची किंमत वाढली; सोने खरेदीआधी चेक करा सोन्या-चांदीचे नवीन भाव