मुंबई : जेव्हापासून ओलाने इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे, तेव्हापासून कंपनीच्या अडचणी वाढत आहेत. त्याचबरोबर काही ग्राहक स्कूटर आणि कंपनीच्या कार्यशैलीला इतके कंटाळले आहेत की ते स्वत:च्या हाताने गाड्यांना पेटवत आहेत किंवा गाढवाला बांधून स्कूटर ओढत आहेत. तसेच गेल्या आठवड्यात ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. (Find out why he had to burn his own Ola electric scooter S1 pro and what went behind the scenes which not many knows Video)

तामिळनाडूतून एक ताजे प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरला स्वतःच पेटवून टाकले. तामिळनाडूतील अंबूर शहरातील रहिवासी असलेले पृथ्वीराज गोपीनाथन म्हणाले की, त्यांच्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरला सतत समस्या येत होत्या. ग्राहक सेवा केंद्र ऐकून समस्या सोडवण्याची काळजी करत नाही. त्यामुळे संतापलेल्या गोपीनाथन यांनी अखेर स्वतः स्कूटरवर पेट्रोल शिंपडून पेटवून दिले. ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लावण्याआधी पृथ्वीराजने कंपनीशी विविध स्तरांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अपेक्षित तो प्रतिसाद आला नाही. पृथ्वीराज यांनी ओला स्कूटर कंपनीला ई-मेलही लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटले होते की, मी तुमच्याकडे चौथ्यांदा तक्रार करत आहे. या ई-मेलमध्ये त्यांनी 15 एप्रिल रोजी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या तक्रारीचा स्क्रीनशॉटही जोडला आहे.

त्यात लिहिले आहे की, बॅटरी अचानक डिस्चार्ज झाली. बॅटरी आधी 20 टक्क्यांपर्यंत चार्ज झाली आणि नंतर अचानक ती शून्य टक्के झाली. मी तुमच्या मूर्ख आणि निरुपयोगी कस्टमर केअरला अनेकदा फोन केला. पण तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पृथ्वीराज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा जळणारा फोटो आणि व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिले की बराच वेळ वाट पाहिली. मी तुमच्या सेवेला कंटाळलो आहे. आता ते तुम्हाला दाखवण्याची वेळ आली आहे. धन्यवाद. तसेच यापूर्वी महाराष्ट्रात सचिन गित्ते नावाच्या व्यक्तीने ओला स्कूटर चांगली कामगिरी न केल्याने आणि कंपनीकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने गाढवाने ओढली होती. भविष्यात कोणीही ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू नये, असे आवाहनही त्यांनी लोकांना केले.

Share.

Leave A Reply

Exit mobile version