मुंबई – जपानची हाय-स्पीड ट्रेन शिंकनसेन भारतीय परिस्थितीशी जुळवून घेत आहे. भारतातील तापमान, धूळ आणि वजनानुसार शिंकनसेन ट्रेनमध्ये बदल करण्यात येत आहेत. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनची पहिली चाचणी 2026 पर्यंत गुजरातच्या सुरत-बिलीमोरा सेक्शनवर सुरू केली जाईल. देशातील पहिली बुलेट ट्रेन (Bullet train) मुंबई-अहमदाबाद (Mumbai – Ahmedabad ) दरम्यान धावणार आहे.
मुंबई-अहमदाबाद दरम्यान एकूण 502 किमी लांबीचा हायस्पीड कॉरिडॉर तयार करण्यात येत असल्याची माहिती अग्निहोत्री यांनी दिली. यापैकी 352 किमीचा ट्रॅक गुजरात राज्यात टाकायचा आहे. त्यासाठी 98.7 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.
रोजचा अहवाल रेल्वेमंत्र्यांना पाठवला जात आहे
सुरत-नवसारी सेक्शनवरील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीच्या कामाची पाहणी केल्यानंतर सतीश अग्निहोत्री यांनी पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्राधान्याने केले जात आहे. यावेळी जपानचे राजदूत सातोशी सिझुकीही उपस्थित होते. प्रकल्पाच्या कामाचा प्रगती अहवाल दररोज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवला जातो. अग्निहोत्री यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात असा दावा केला की सुरत-बिलीमोरा (48 किमी) सेक्शनवर बुलेट ट्रेनची चाचणी डिसेंबर 2026 मध्ये सुरू होईल.
सर्व कंत्राटे भारतीय कंपन्यांना
अग्निहोत्री म्हणाले की, बुलेट ट्रेन प्रकल्पात सध्या 20 हजार लोक काम करत आहेत. लवकरच या प्रकल्पात एक लाख लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. ते म्हणाले की, मेक इन इंडिया अंतर्गत सर्व प्रकल्प भारतीय कंपन्यांना देण्यात आले आहेत. नर्मदा पूल, माही पूल, ताप्ती पूल आणि साबरमती पुलावर विहिरींच्या पायाभरणीचे काम सुरू आहे. याशिवाय वापी-साबरमतीपर्यंतच्या आठही बुलेट ट्रेन स्थानकांवर विविध टप्प्यांत बांधकाम सुरू आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
बुलेट ट्रेनचा अपघात होणार नाही
सतीश अग्निहोत्री म्हणाले की, जपानच्या तांत्रिक, रोलिंग स्टॉक आणि सिग्नल यंत्रणेमुळे बुलेट ट्रेनला कधीही अपघात होणार नाही. या तंत्रज्ञानाला Crash Avoidance System म्हणतात.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर एक नजर
कॉरिडॉरची एकूण लांबी 508.17 किमी आहे.
कमाल वेग ताशी 320 किलोमीटर असेल
मुंबईहून अहमदाबादला पोहोचण्यासाठी 2.07 तास लागतील (काही थांब्यांसह)
सर्व थांब्यांसह 2.58 तास लागतील
एकूण स्थानकांची संख्या – 12
गुजरातमध्ये – 8
महाराष्ट्रात – 4
ही स्थानके गुजरातमध्ये असतील: वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद/नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती
महाराष्ट्र स्टेशन : मुंबई (BKC), ठाणे, विरार आणि बोईसर