Budget Scooters : ‘या’ आहेत Hero आणि TVS च्या दमदार मायलेज स्कूटर, तुमच्या बजेटमध्ये न्या घरी; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Budget Scooters : Hero आणि TVS च्या काही उच्च मायलेज स्कूटर आहेत. ज्या तुम्हाला 1 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील. विशेष म्हणजे यात कंपनीकडून उत्तम फीचर्स दिले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

TVS Ntorq 125

कंपनीकडून आपल्या TVS Ntorq 125 मध्ये सुरक्षिततेसाठी ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. जे ब्लूटूथ-कनेक्टिव्हिटी आणि चार्जिंग सॉकेटसह येतील. TVS च्या या जबरदस्त स्कूटरमध्ये 5.8 लीटरची इंधन टाकी असून हे अलॉय व्हील आणि हेवी सस्पेन्शन पॉवरसह येते.

या शानदार स्कूटरमध्ये 124.8 cc इंजिन दिले आहे. तर स्कूटरच्या सीटची उंची 770 मिमी इतकी आहे. स्कूटरमध्ये 6 प्रकार आणि 14 रंग पर्याय दिले आहेत. या स्कूटरला 41 kmpl चे मायलेज मिळेल. किमतीचा विचार केला तर स्कुटर 87135 रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. कंपनीची ही हाय स्पीड स्कूटर आहे.

Hero Xoom 110

स्कूटरच्या सीटची उंची 770 मिमी असून घरातील सर्व सदस्य सहजपणे त्यावर चालवू शकतात. स्कुटरच्या पुढच्या टायरवर टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस सिंगल शॉक ऑब्झर्व्हर सस्पेंशन दिले आहे. तर किमतीबद्दल बोलायचे झाले तर Hero Xoom 110 ऑन-रोड 85435 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.

हे 110.9 cc च्या सॉलिड इंजिनसह येत असून या स्कूटरमध्ये डिजिटल कन्सोल आणि एक मोठा हेडलाइट दिली आहे. यात 5.2 लीटरची इंधन टाकी आहे. हिरोच्या या स्कूटरचे वजन 108 किलो इतके आहे. स्कुटरचे हाय पॉवर इंजिन 8.05 bhp ची पॉवर आणि 8.7 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते.

Yamaha Ray ZR 125

Yamaha Ray ZR 125 या स्कूटरमध्ये 125 सीसी इंजिन असून स्कूटरच्या सीटची उंची 785 मिमी इतकी आहे. किमतीचा विचार केला तर यामाहा स्कूटरची सुरुवातीची किंमत 87080 रुपये एक्स-शोरूम किंमत इतकी आहे. यात हेल्मेट आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी 21 लीटर अंडरसीट स्टोरेज दिले आहे. ही एक स्टायलिश स्कूटर असून यात ड्युअल टोन कलर पर्याय आहे. Ray ZR 125 मध्ये 12 इंच अलॉय व्हील आहेत. ही स्मार्ट स्कूटर रस्त्यावर सहज 49 kmpl मायलेज मिळवते.

Leave a Comment