Budget 2024: Income Tax बाबत मोदी सरकार देणार मोठा दिलासा, काय होणार बदल?

Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मसाठी अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर करण्यात आला होता. त्यावेळी सरकारने करदात्यांना कोणत्याही करात सवलत दिली नव्हती, मात्र यावेळी अपेक्षा थोड्या जास्त असल्याचं दिसून येत आहे. कारण त्यात बराच काळ बदल झालेला नाही.

5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन नव्या बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा करू शकतात. नवीन टॅक्स स्लॅबबाबत पगारदारांसाठी मोठी घोषणा होऊ शकते. अर्थमंत्री 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करू शकतात. कर रचनेत 80C अंतर्गत सूट 1.5 लाख रुपये केली जाऊ शकते. याशिवाय गृहकर्जावरील व्याजाची मर्यादा 2 लाख रुपयांनी वाढू शकते. याशिवाय, सरकार आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरही मोठी सवलत देऊ शकते.

 कराची गणना कशी करावी

नवीन आयकर प्रणाली अंतर्गत 2023-24 आर्थिक वर्षासाठी दर आणि स्लॅब

0-3 लाख – शून्य

3-6 लाख रुपयांपर्यंत – 5 टक्के

6-9 लाख पर्यंत – 10 टक्के

9-12 लाखांपर्यंत – 15 टक्के

12-15 लाखांपर्यंत – 20 टक्के

रु. 15,00,000 पेक्षा जास्त – 30 टक्के

Leave a Comment