Budget 2024 । समजा तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर तुम्ही लगेचच एक काम करा. यामुळे तुम्हाला शून्य कर भरावा लागेल. नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला.
यावेळी त्यांनी जुन्या करप्रणालीत कोणताही बदल केला नाही. देशातील दोन तृतीयांश करदाते नवीन कर प्रणालीकडे वळले असून आता गोष्ट अशी आहे की तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असल्यास तुम्हाला या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
अशी करा पैशांची बचत
जर तुमचे उत्पन्न 10 लाख रुपये असल्यास तुम्हाला कर वाचवण्यासाठी जुन्या कर प्रणालीचा अवलंब करावा लागणार आहे. तुम्हाला कर वाचवण्यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. पण जर तुम्ही कर सवलतीचा दावा केला नाही तर तुम्हाला 20 टक्के दराने कर भरावा लागेल, पण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर संपूर्ण कर बचत करू शकता.
अशी होईल पैशांची बचत
- तुम्ही PPF, EPF, ELSS आणि NSC सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपये वाचवू शकता कारण आता करपात्र उत्पन्न 8 लाख आहे
- तुम्ही एनपीएसमध्ये वार्षिक 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला कलम 80CCD (1B) अंतर्गत 50 हजार रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल. आता करपात्र उत्पन्न 7.5 लाख आहे.
- जर तुम्ही गृहकर्ज घेतले असल्यास तुम्ही आयकर कलम 24B अंतर्गत त्याच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता.
- जर आपण रु. 7.5 लाख मधून 2 लाख अधिक वजा केल्यास एकूण करपात्र उत्पन्न रु. 5.5 लाख होईल.
प्राप्तिकराच्या कलम 80D अंतर्गत, तुम्हाला वैद्यकीय पॉलिसीवर 25,000 रुपयांची सवलत मिळेल. तसेच तुम्ही तुमच्या पालकांसाठी आरोग्य विमा खरेदी करून 50,000 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. या दोन्ही योजनांचा लाभ घेऊन तुम्हाला 75 हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो. अशा स्थितीत तुमचे करपात्र उत्पन्न 5.50 लाखांवरून 4.75 लाख रुपये होईल. - 4.75 लाखाचे उत्पन्न हे रु. 5 लाखाच्या जुन्या कर प्रणालीच्या कर कंसाच्या खाली असून जुन्या कर प्रणालीनुसार तुम्हाला या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
नवीन कर प्रणालीतील बदल
निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीत बदल केले आहेत. जर तुम्हाला 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर वाचवायचा असेल तर तुम्हाला जुनी कर प्रणाली निवडावी लागणार आहे. हे लक्षात घ्या की नवीन कर प्रणालीमध्ये तुम्हाला कर सूट मिळू शकत नाही.