Budget 2024 । महाराष्ट्रासाठी बजेटमधील मोठ्या घोषणा काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

Budget 2024 । आज केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला असून या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार दिल्या जाणाऱ्या पाच किलो मोफत धान्य देण्याची डेडलाईन वाढवली आहे. पुढची पाच वर्ष गरीबांना मोफत अन्न दिले जाईल.

जाणून घ्या घोषणा

  • पाच राज्यांसाठी नवीन किसान क्रेडिट योजना आणणार
  • ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद असेल.
  • आंध्रप्रदेशाला 15 हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.
  • 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्ट्रीवर नोंदवण्यात येणार आहे.
  • पूर्वेकडी राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 100 पेक्षा जास्त शाखा उघडणार
  • पहिल्यांदाच सरकारी नोकरी लागलेल्या 30 लाख युवकांचे एक महिन्याचे पीएफ आंशिकरित्या सरकार भरेल.
  • भाजीपाला उत्पादन आणि वितरणासाठी आणखी एफपीओ स्थापन केले जाईल.
  • पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 1.8 कोटी लोकांनी आतापर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे.
  • पीएम आवास योजना- शहरी 2.0साठी एक कोटी कुटुंबाला घरे दिली जाणार असून त्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
  • सरकार शहरी घरांसाठी स्वस्तात कर्ज देण्यासाठी व्याज सबसिडी योजना आणली जाईल.
  • राज्यांसाठी कर्जाची मर्यादा वाढवली आहे
  • टॅक्स प्रकरणे सहा महिन्यात सोडवली जाईल.
  • इन्कम टॅक्स अॅक्ट 1961ची सहा महिन्यात समीक्षा केली जाईल.
  • स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल टॅक्स प्रणाली रद्द
  • पंतप्रधान इंटर्नशीप योजनेनुसार 5 हजार रुपये मासिक भत्ता मिळेल.
  • आसाममधील पूर नियंत्रणासाठी केंद्र आर्थिक मदत करेल.
  • बिहारच्या कोसीसाठीही योजना राबवली जाईल.
  • सरकार ऊर्जा सुरक्षा आणि बदलासाठी एक धोरणात्मक निर्णय घेईल.
  • परदेशी कंपन्यांवरील कार्पोरेट टॅक्स दर 40 टक्क्यांवरून 35 टक्के होणार आहे.
  • बिहारमध्ये हायवेसाठी 26 हजार कोटींची तरतूद

न्यू रिजीममध्ये टॅक्स स्लॅब

  • 0-3 लाखाच्या उत्पन्नावर कोणताच कर नसेल
  • तसेच 3 ते 7 लाखाच्या उत्पन्नावर 5 टक्के कर
  • 7 ते10 लाखाच्या उत्पन्नावर 10 टक्के कर असेल.
  • 10 ते 12 लाखाच्या उत्पन्नावर 15 टक्के कर असेल.
  • 12 ते 15 लाखाच्या उत्पन्नार 20 टक्के कर असेल.
  • 15 लाखापेक्षा जास्तच्या उत्पन्नावर 30 टक्के कर असेल.
  • जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये काहीच बदल नाही

या वस्तू होणार स्वस्त

  • मोबाईल फोन
  • कॅन्सरची तीन औषधे
  • सोने, चांदी
  • मासे
  • चार्जर
  • चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू

Leave a Comment