BSNL : जरी Jio, Airtel आणि Vodafone Idea या देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहेत, परंतु सरकारी कंपनी BSNL देखील कमी किमतीत चांगले प्लान देण्यात काही कमी नाही. महागाईच्या या काळात जवळपास प्रत्येकजण स्वस्त प्लान्सच्या शोधात असतो. अशा परिस्थितीत, जर एखाद्याला त्याचे दुसरे सिम (Sim Card) देखील अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर त्याचा खर्च आणखी वाढतो. पण आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशा प्लानबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला प्रतिदिन सुमारे 2 रुपये दराने वर्षभराची वैधता (Validity) मिळेल. याशिवाय डेटा आणि कॉल फायदेही मिळतील. इतका स्वस्त प्लान क्वचितच कोणती कंपनी देते. चला तर मग या प्लानबद्दल सर्व काही तपशीलवार जाणून घेऊ या..
Jio ने आणला ‘हा’ जबरदस्त प्लान.. फक्त एकाच रिचार्जमध्ये 5 लोक टेन्शन फ्री; जाणून घ्या, कसे ते.. https://t.co/zo7uvpvZPo
— Krushirang (@krushirang) July 14, 2022
365 दिवसांची वैधता 2 रुपये प्रतिदिन
खरं तर, आम्ही बीएसएनएलच्या 797 रुपयांच्या प्लानबद्दल (Prepaid Plan) माहिती देत आहोत. जे कंपनीने खास अशा लोकांसाठी डिझाइन केले आहे, ज्यांना त्यांचे दुसरे सिम अॅक्टिव्ह ठेवायचे आहे. प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. याशिवाय, पहिल्या दोन महिन्यांसाठी (म्हणजे 60 दिवसांसाठी) दररोज 2GB हायस्पीड डेटा, मोफत कॉल आणि 100 एसएमएस मिळतात. 60 दिवसांनंतर हे मोफत फायदे मिळणे बंद होईल म्हणजेच 60 दिवसांनंतर डेटा (Data) आणि कॉल फायदे मिळणार नाहीत. पण वैधता 365 दिवसांसाठी सुरू राहील. युजर स्वतंत्रपणे डेटा आणि टॉक टाइमसाठी (Talktime) रिचार्ज करू शकतात. हा प्लान सर्व मंडळांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला दुसरे सिम अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.
BSNL : वाव.. फक्त 3 रुपयांत मिळणार 1 GB डेटा.. सरकारी कंपनीचा ‘हा’ नवा प्लान आहे भारीच.. https://t.co/WHDgkZTv01
— Krushirang (@krushirang) July 14, 2022
अन्य कंपन्यांकडेही रिचार्ज प्लान आहेत. मात्र त्यांच्या प्लानच्या किंमती जास्त आहेत. त्यामुळे बीएसएनएलचे रिचार्ज प्लान जास्त फायदेशीर ठऱतात. फक्त एकच अडचण आहे. ती म्हणजे, बीएसनएनएलकडे अद्याप 4G नेववर्क नाही. दुसऱ्या खासगी कंपन्यांच्या तुलनेत हा मोठा नुकसानदायक मुद्दा आहे. यामुळेही कंपनीला फटका बसत आहे. कंपनीने आता 4G नेटवर्क (4G Network) सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. हे नेटवर्क लवकरच सुरू होईल, असेही सांगण्यात येत आहे.