BSNL Recharge: देशाची नंबर एक टेलिकॉम कंपनी जिओशी स्पर्धा करण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने जबरदस्त रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे.
याचा लाभ घेतो तुम्ही अगदी कमी किमतीत वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डेटा वापरू शकतात.
BSNL च्या या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर BSNL चा Rs 1515 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या हा रिचार्ज प्लॅन 1 वर्षाच्या कालावधीसाठी वैध आहे.
यामध्ये यूजरला कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधाही मिळते. महागड्या रिचार्जपासून मुक्त होण्यासाठी आणि परवडणाऱ्या किमतीत हा एक उत्तम पर्याय आहे.
बीएसएनएल वार्षिक रिचार्ज
BSNL आपल्या वापरकर्त्यांना फक्त 1515 रुपयांचा एक वर्षाचा रिचार्ज प्लॅन देत आहे. जर आपण 12 महिन्यांसाठी 1515 रुपये पाहिल्यास, दरमहा सरासरी 126 रुपये खर्च येतो. तुम्ही महिन्याला जवळपास 126 रुपये जोडून असा प्लान देखील घेऊ शकता. 1515 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह 2 GB इंटरनेट डेटा दिला जातो. यासोबतच तुम्हाला दररोज 100 एसएमएस देखील मिळतील. रोजचे इंटरनेट संपल्यानंतरही तुम्हाला कमी गतीचे इंटरनेट मिळत राहील.
परवडणारी योजना
कमी पैशाबद्दल बोलायचे तर बीएसएनएल सर्वच क्षेत्रात पुढे आहे. बीएसएनएलच्या ब्रॉडबँड सेवेपुढे कोणीही टिकू शकत नाही. यामध्ये परवडणारी योजना असण्यासोबतच डेटा स्पीड देखील सर्वात जास्त आहे. 5G च्या युगातही BSNL इतर कंपन्यांना स्पर्धा देत आहे. BSNL सध्या फक्त 4G नेटवर्कवर काम करत आहे.
BSNL 5G
केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे की सरकारी मालकीची टेल्को 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 5G ऑपरेशन्स सुरू करेल. सरकारी मालकीच्या BSNL चे 4G आणि 5G नेटवर्क पूर्णपणे देशांतर्गत असतील असेही ते म्हणाले.