मुंबई : खाजगी दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया एकापाठोपाठ एक अनेक उत्तम प्लान लाँच करत आहेत. तथापि, डेटा आणि वैधतेच्या बाबतीत सरकारी कंपनी बीएसएनएलशी स्पर्धा करणे खूप कठीण आहे. जर तुम्ही स्वस्त प्रीपेड प्लान शोधत असाल जो दीर्घकाळ टिकेल, तर BSNL कडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येथे आम्ही तुम्हाला 499 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या BSNL च्या दीर्घकालीन वैधता योजनांबद्दल सांगत आहोत.
यादीतील पहिला प्लान 399 रुपयांचा आहे. या प्लानमध्ये 80 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. प्लानमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 1 GB डेटासह 100 SMS प्रतिदिन मिळतात. हा प्लान BSNL ट्यून सबस्क्रिप्शन देखील देतो.
त्याचप्रमाणे, दुसरा प्लान 429 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला फक्त 1 दिवसाची अतिरिक्त वैधता मिळेल. या 81 दिवसांच्या प्लानमध्ये दररोज 1 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS मिळतात. विशेष म्हणजे, यामध्ये तुम्हाला Eros Now चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
त्याच किंमत श्रेणीतील आणखी एक प्लान 447 रुपयांचा आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 100 GB हाय-स्पीड डेटा दिला जाईल. प्लानची वैधता 60 दिवसांची असेल. विशेष म्हणजे डेटा वापरण्यासाठी रोज काही मर्यादा नाही. या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉल्स, 100 एसएमएस प्रतिदिन बीएसएनएल ट्यून्स आणि इरॉस नाऊ मोफत सदस्यता देखील मिळते.
या यादीतील शेवटचा प्लान 499 रुपयांचा आहे. हा प्लान पूर्ण 3 महिने म्हणजेच 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 2 GB चा हायस्पीड डेटा मिळतो. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 180 GB डेटा मिळेल. यामध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस दिले जातात. मात्र, ओटीटी सबस्क्रिप्शन दिलेले नाही.
रिचार्ज प्लानची मुदत वाढणार तीन महिने.. ऑफरसाठी राहिलेत फक्त तीन दिवस; जाणून घ्या, डिटेल..