BSNL : नवी दिल्ली : सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या 4जी नेटवर्कबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता अहवाल प्राप्त झाला आहे, की कंपनी आपली 4G सेवा रोलआउट करण्याच्या तयारीत आहे आणि ती जानेवारीपासून सुरू होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने 4G नेटवर्क उभारण्यासाठी TCS ला निविदा जारी केली आहे. TCS पुढील 2 ते 3 दिवसांत निविदेला आपली संमती देऊ शकते. कंपनीला 1 लाख टॉवर बसवण्याची ऑर्डर मिळणार असल्याची माहिती आहे.
कंपनीला दोन वर्षात टॉवर बसवावे लागणार आहेत. टॉवर उभारण्यासाठी एकूण 26,821 कोटी रुपये खर्च येणार आहे. बीएसएनएलला नुकतेच सरकारकडून 1.64 लाख कोटी रुपयांचे बेलआउट पॅकेज मिळाले आहे. BSNL ने अलीकडेच एका निवेदनात म्हटले होते की, 4G सेवा सुरू झाल्यानंतर, पूर्वीपेक्षा जास्त ग्राहक कंपनीत सामील होतील. सरकारला विश्वास आहे की BSNL च्या 4G नेटवर्कच्या रोलआउटमुळे, भारताची गणना अमेरिका, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि चीनसारख्या देशांच्या क्लबमध्ये होईल.
BSNL पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपली 4G सेवा सुरू करू शकते. Tata Sons चे युनिट तेजस नेटवर्क BSNL साठी नेटवर्क रेडिओ उपकरणे तयार करेल. TCS ला पुढील 9 वर्षे नेटवर्कही सांभाळावे लागणार आहे. सरकारने याआधीच निविदा मंजूर केल्या आहेत. बीएसएनएलच्या 4जी टेंडरमध्ये फक्त एकच कंपनी पात्र ठरली होती. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, BSNL ने ऑगस्ट 2023 पर्यंत 5G लाँच करण्याची योजना आखली आहे. कंपनीला एकाच वेळी 4G आणि 5G सेवेचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी नवीन योजना आखण्यात आली आहे.
- Read : BSNL Broadband Plan : BSNL ने आणलेत ‘हे’ जबरदस्त प्लान; पहा, काय मिळतात फायदे ?
- Jio-Airtel Speed : ‘त्यामध्ये’ जिओच ठरला बेस्ट.. पहा, Vodafone-BSNL मिळाला कितवा नंबर