मुंबई – सरकारी दूरसंचार कंपनी BSNL 1200 रुपयांच्या फायद्यासह फायबर ब्रॉडबँड प्लान (Fiber Broadband Plan) ऑफर करत आहे. BSNL भारत फायबरच्या ब्रॉडबँड प्लान्स थेट एअरटेल एक्सस्ट्रीम (Airtel Extreme) फायबर आणि जिओ फायबरच्या (Jio Fiber) योजनांबरोबर स्पर्धा करतात. आपला फायबर व्यवसाय वाढविण्यासाठी BSNL त्यांच्या विद्यमान ब्रॉडबँड युजर्सना फायबर सेवेवर स्विच केल्यास त्यांना 1200 रुपयांचा लाभ देत आहे.
बीएसएनएल फायबर ब्रॉडबँड सेवेवर स्विच करणार्या युजर्सना सहा महिन्यांपर्यंत प्रत्येक बिलावर 200 रुपयांची सूट (Discount) देत आहे. म्हणजेच सहा महिन्यांत ग्राहकांना एकूण 1200 रुपयांची सूट मिळू शकते. ही सूट कंपनीने ऑफर केलेल्या प्रत्येक फायबर ब्रॉडबँड प्लानवर उपलब्ध असेल. BSNL ची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे आणि फक्त पहिल्या 60 दिवसांसाठी उपलब्ध असेल. BSNL ने ओव्हर-द-टॉप (OTT) सबस्क्रिप्शनसह (Subscription) फायबर ब्रॉडबँड योजना देखील एकत्रित केल्या आहेत. 30 एमबीपीएस ते 300 एमबीपीएस स्पीडच्या दरम्यान ऑफर करणाऱ्या प्लानमधून निवड करू शकतात.
300 Mbps पेक्षा जास्त स्पीड देणारी कंपनीने ऑफर केलेली कोणतीही योजना नाही. ग्राहक त्यांच्या जवळच्या बीएसएनएल कार्यालयात किंवा कार्यालयात फोन कॉलद्वारे त्यांचे विद्यमान डीएसएल कनेक्शन सहजपणे फायबर कनेक्शनमध्ये रूपांतरित करू शकतात.
BSNL चे तीन जबरदस्त प्लान.. फायदे मिळतात अमर्याद, किंमतीतही कमी; जाणून घ्या, डिटेल..