British prime minister rishi sunak: मुंबई (Mumbai): ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असून भारतीय वंशाचेही पहिले ब्रिटिश पंतप्रधान (first British Prime Minister of Indian origin) आहेत. त्यामुळे अनेक हिंदुत्ववाद्यांना यामुळे गगन ठेंगणे झाल्याचा फील आलेला आहे. असे असतानाच त्यांचे एक जुने विधान ट्विटरवर व्हायरल झाले. ऋषी सुनक यांचे हे विधान गोमांसाशी संबंधित आहे. ज्यात त्यांनी बिफ खाण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. (encouraged to eat beef)
वास्तविक जुलै 2022 मध्ये जेव्हा ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी प्रचार करत असताना त्यांनी त्यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवडून आल्यास स्थानिक मांस विक्री उद्योगाला चालना देणार असल्याचे म्हटले होते. यासोबतच शेतकऱ्यांना गोमांस (बीफ) आणि कोकरू (मेंढी) मांस उत्पादनासाठी प्रोत्साहित केले जाईल, असेही जाहीर केले होते. या ट्विटसोबत त्यांनी एक मुलाखतही शेअर केली आहे. आता तेच भारतात वेगाने व्हायरल होत आहे. द टेलिग्राफला (The Telegraph) दिलेल्या मुलाखतीत ऋषी सुनक म्हणतात, ‘ग्रामीण खासदार म्हणून नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे (to protect the natural environment) किती महत्त्वाचे आहे, हे समजले आहे. मी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी (stand with farmers) उभा राहीन. माझ्या मतदारसंघातील शेकडो शेतकरी गोमांस आणि कोकरूच्या मांसासाठी प्राणी वाढवतात आणि मी त्यांना मदत करण्यास वचनबद्ध आहे… लोक काय खातात हे पूर्णपणे त्यांच्या आवडी किंवा निवडीवर अवलंबून आहे. माझ्या सरकारमध्ये पशुपालकांची विशेष काळजी घेतली जाईल. कृषी क्षेत्रात मी अशी सुधारणा करणार आहे जी गेल्या 50 वर्षांत झाली नसती. देशासाठी देशांतर्गत अन्न उत्पादन खूप महत्त्वाचे आहे.’ (Domestic food production)
- म्हणून Prime Minister Rishi Sunak यांना infosys चे मिळतात शेकडो कोटी; पहा नेमके काय आहे यामागे गणित
- Food Recipe :संध्याकाळी भूक शमवण्यासाठी हे आरोग्यदायी ‘चवळी चाट’ एकदा करून पहा.
- Delhi air toxic during Diwali: अरे बापरे…ऐन दिवाळीत ‘येथील’ हवा अत्यंत प्रदूषित; लोकही पर्यावरणाप्रती बेजबाबदार
आता ऋषी सुनक यांच्या गोमांसाबद्दलच्या विधानाच्या आडून ते गोमांसही खातात असा दावा ट्विटरवर अनेक लोक करत आहेत. मात्र, द टेलिग्राफच्या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की ऋषी सुनक गोमांस खात नाहीत आणि ते फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी गोमांस आणि मांसाचा व्यापार वाढवण्यासाठी मदत करत आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये गायीशी संबंधित ऋषी सुनक यांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. ते पहिल्यांदाच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. यामध्ये तो गायीची पूजा करताना दिसत आहे. जन्माष्टमीनिमित्त ऋषींनी पत्नी अक्षरासोबत गाईची पूजा केली होती.
सूचना: ब्रिटेन का प्रधानमंत्री ऋषि सुनक गाय की पूजा भी करता है और बीफ़ भी दबा कर खाता है…
.
सूचना समाप्त…@SureshChavhanke pic.twitter.com/B0mBTYEKkZ— Junaid Anwar (@JunaidA07249811) October 25, 2022
My constituency is home to hundreds of beef and lamb farmers and I am committed to supporting the fantastic industry they represent.
People’s food choices are their own. I would lead a government that champions our livestock farmers at home and abroad.https://t.co/ThHbAbhxz0 pic.twitter.com/rZ4ngtwCEB
— Rishi Sunak (@RishiSunak) July 30, 2022