दिल्ली – ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या सरकारसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गेल्या 48 तासांत 5 कॅबिनेट मंत्र्यांसह 39 मंत्र्यांनी राजीनामे (Minister Resign uk) दिले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान जॉन्सन यांच्यावर खुर्ची सोडण्याचा दबाव वाढला आहे. गेल्या महिन्यात सरकार वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ऋषी सुनक (Rushi Sunak) आणि साजिद जाविद या दोन मंत्र्यांनीही जॉन्सन यांचे समर्थन मागे घेतले आहे. एका महिन्यात बोरिस सरकारला धोका होण्याची ही दुसरी वेळ आहे.
आरोग्यमंत्री साजिद जाविद आणि भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या राजीनाम्याने सुरू झालेले राजीनाम्यांचे सत्र बुधवारीही सुरूच होती. वित्तीय सेवा सचिव जॉन ग्लेन, सुरक्षा सचिव रॅचेल मॅक्लीन, निर्यात आणि समानता मंत्री माईक फ्रीर, गृहनिर्माण आणि समुदाय कनिष्ठ मंत्री नील ओब्रायन, शिक्षण विभागाचे कनिष्ठ सचिव अॅलेक्स बर्घार्ट यांच्यासह 39 जणांनी जॉन्सनवर अविश्वास व्यक्त करत राजीनामा दिला आहे.
ब्रिटनच्या राजकारणात निर्माण झालेल्या वादळातूनही काही प्रश्न उपस्थित होत आहेत. तिथे पुढे काय होणार ? बोरिस यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाऊ शकते आणि जॉन्सनने राजीनामा दिला तर नवा पंतप्रधान कसा निवडला जाईल, बोरिस जॉन्सन यांनी गेल्या महिन्यात पार्टीगेटच्या मुद्द्यावरून विश्वासदर्शक ठराव जिंकला. पक्षाच्या नियमांनुसार 12 महिन्यांपर्यंत त्यांच्याविरुद्ध दुसरा अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणता येत नाही.
Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे धक्कादायक वक्तव्य.. सांगितले कर्जाचे गणित; जाणून घ्या.. https://t.co/KgDwCZkblE
— Krushirang (@krushirang) July 7, 2022
दरम्यान, आता जॉन्सनच्या स्वत:च्या पक्षातील काही खासदारांना हा 12 महिन्यांचा कालावधी कमी किंवा काढून टाकण्याची इच्छा आहे. मंत्र्यांच्या धर्तीवर बाकीच्या कॅबिनेट मंत्र्यांनीही राजीनामा द्यावा, असे आवाहन करणारे काही खासदार करत आहेत. बोरिस यांना राजीनामा देण्यास भाग पाडणे हा त्याचा साधा हेतू आहे. अशा परिस्थितीत बोरिस जॉन्सन यांनी बहुमत गमावले तर ते राजीनामा देऊन नव्याने निवडणुकीची घोषणाही करू शकतात. बोरिस जॉन्सन राजीनामा देण्यास तयार नाहीत. ते म्हणतात, की ‘त्यांच्या राजीनाम्यामुळे लवकर निवडणुका होतील, ज्यात पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागू शकते.
रशियाला वेगळा करण्याचा ब्रिटेनचा प्लान.. भारताच्या मदतीसाठी केल्या मोठ्या घोषणा; जाणून घ्या..