Breakfast ideas for kids मुलांच्या डब्यात रोज काय पदार्थ द्यायचे? मुलांसाठी काय बनवायचे हा जगातल्या प्रत्येक आईसमोर असलेला प्रश्न आहे. त्यात सध्या विविध प्रकारच्या जंकफूडसाठी मुलांचा हट्ट सुरूच असतो. वाढत्या वयात चुकीचे पदार्थ खाल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हवामान बदलले किंवा अभ्यासाचा ताण वाढला किंवा प्रवास केला तर मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते. त्यासाठी मुलांना जर अशा काही पदार्थापासून बनवलेला नाष्टा दिला तर मुले सारखी आजारी पडणार नाहीत.
healthy diet
मुलांसाठी खायला करायचे म्हटले की आईला खूप विचार करावा लागतो. तो पदार्थ पोषकही असायला हवा आणि चविष्टही असायला हवा हे टेन्शन आईला असते. पण असे पाच घटक आहेत की त्यापासून बनणाऱ्या नाष्ट्यामुळे मुलांच्या पोटात पोषक आहार तर जाईलच पण आईलाही फार धावपळ न करता कमी वेळेत पदार्थ बनवता येतील. हे असे पदार्थ आहेत की ज्यामुळे मुलांचा केवळ शारीरीकच नव्हे तर मानसिक विकासही झपाट्याने होईल
health tips
सध्या उन्हाळा वाढलाय त्यामुळे मुलांना तळलेले पदार्थ किंवा उष्ण पदार्थ नको असतात. त्यासाठी मुलांच्या आवडीच्या फळांचे आकर्षक आकारात काप बनवून ते योगर्ट किंवा दह्यासोबत देऊ शकता. फळांवर थोडासा चाटमसाला किंवा आमचूर पाडवर पेरला तर ही डीश छान चटपटीतही होते. दुसरा पदार्थ म्हणजे दडपे पोहे. यासाठी पातळ पोह्यांमध्ये टोमॅटो, कांदा, ओले खोबरे आणि थोडा लिंबाचा रस घालून एकत्र करायचे आणि त्यावर फोडणी द्यायची. नाष्ट्याला जर मुलांनी हा पदार्थ खाल्ला तर त्यांना एक वेळच्या जेवणाचे पोषकमूल्य मिळेल. मूगडाळ ही खूप फायदेशीर असते त्यामुळे मुगाच्या डाळीचा शिरा किंवा दोनतीन भाज्या घालून मुगाची खिचडी मुलांसाठी झटपट बनवू शकता. चपाती आणि गुळ एकत्र करून मलिद्यापासून लाडू बनवण्याचाही उत्तम पर्याय आहे. तसेच कोणत्याही ऋतूत मुलांना सुकामेव्याचे लाडू दिले तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.