Brain stroke । स्ट्रोकच्या आठवडाभर आधी शरीरात दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा नाहीतर…

Brain stroke । ब्रेन स्ट्रोक हा अतिशय घातक आजार आहे. या आजारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे चुकूनही या आजाराकडे दुर्लक्ष करू नये. स्ट्रोकच्या 7 दिवस आधी तुमच्या शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. कोणती आहेत ही लक्षणे जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

जाणून घ्या ब्रेन स्ट्रोकची लक्षणे –

1- जर तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येणार असेल तर तुम्हाला अशक्तपणा जाणवायला सुरुवात होते. यामुळे तुमचे हात आणि पाय सुन्न होतील. अशी लक्षणे तुम्हाला दिसली तर आपण ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला नाही तर तुम्हाला याचा मोठा फटका सहन करावा लागेल.

2- मेंदूचा झटका येण्यापूर्वी, तुमची दृष्टी अंधुक असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. स्ट्रोकच्या 7 दिवस आधी अचानक दृष्टी अंधुक होण्यास सुरुवात होते.

3- ब्रेन स्ट्रोक येण्यापूर्वी तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होतो. बोलण्यातही अडचण येते. अशा वेळी या मोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

4- स्ट्रोकच्या 4- 7 दिवस अगोदर तुम्हाला शरीराचे संतुलन राखण्यात खूप मोठी अडचण येते. यामुळे तुम्ही अनेक वेळा पडता. यामुळे तुमची स्मरणशक्ती कमकुवत होते. ब्रेन स्ट्रोकपूर्वी चक्कर येण्यास सुरुवात होते. अशा वेळी आपण डॉक्टरांशी संपर्क साधावा.

असा टाळा स्ट्रोक

निरोगी जीवनासाठी संतुलित जीवनशैली असणे अतिशय आवश्यक आहे. अशा वेळी स्ट्रोक टाळण्यासाठी, धूम्रपानापासून दूर राहणे, हिरव्या भाज्या, नियमित व्यायाम आणि फळांचा संतुलित आहार, निरोगी वजन यासारख्या घटकांकडे लक्ष देणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Leave a Comment