Electrical Vehicle Charging Station : मुंबई : तुम्ही भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) च्या पेट्रोल पंपावर तेल भरण्यासाठी गेलात, तर ही बातमी तुमच्या महत्वाची आहे. वास्तविक, बीपीसीएल आता आपल्या पेट्रोल पंपांवर काही सुविधा (Electrical Vehicle Charging Station) सुरू करणार आहे. यानंतर तुम्ही एकाच पेट्रोल पंपावर अनेक कामे करू शकाल. बीपीसीएलचे 7000 रिटेल पेट्रोल पंप आहेत. या माध्यमातून कंपनी आणखी काही उपक्रम सुरू करण्याच्या विचारात आहे ज्याचा तुम्हालाही मोठा फायदा होणार आहे.
पेट्रोल पंप इलेक्ट्रिक व्हेईकल (Electrical Vehicle) चार्जिंग सुविधेसह विविध इंधन पर्याय (Fuel Option) ऑफर करणाऱ्या स्टेशनमध्ये रूपांतरित केले जातील. BPCL ने दक्षिणेकडील भागात बेंगळुरू ते चेन्नई आणि बेंगळुरू-म्हैसूर-कूर्ग महामार्गावर ईव्ही चार्जिंग स्टेशन लवकरच सुरू करण्याची घोषणा केली आहे.
- Must Read : Business News : ही कंपनी २,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
- Petrol Price : शनिवारी मिळाला मोठा दिलासा.. पेट्रोलच्या किंमतीबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
- Electric Car : इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांसाठी खुशखबर.. आता चार्जिंगचे टेन्शन घेऊ नका; पहा, काय करतयं सरकार ?
- Ethanol Car : आता पेट्रोलचे टेन्शन विसरा..! लवकरच मिळणार ‘या’ इंधनावर चालणारी कार; पहा, काय आहेत फायदे ?
कंपनीने सांगितले की, हे चार्जर त्याच्या रणनीतिकदृष्ट्या स्थित असलेल्या नऊ इंधन केंद्रांमध्ये आहेत, जे या मार्गांच्या दोन्ही बाजूला सुमारे 100 किमी अंतरावर आहेत. BPCL देशातील प्रमुख शहरे आणि आर्थिक केंद्रांना जोडणाऱ्या सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या त्यांच्या पेट्रोल पंपांवर EV चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. त्यानुसार कंपनीने कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा सुरू होऊ शकेल. कंपनीच्या पेट्रोल पंप देशभरात विखुरले आहेत आणि त्यांची उपलब्धताही चांगली आहे. त्यामुळे येथे चार्जिंग स्टेशन सुरू केल्यास इलेक्ट्रिक वाहनचालकांच्या अडचणी बऱ्याच प्रमाणात कमी होतील. त्याचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे.