Boxer Vijender Singh Joins BJP : काँग्रेसला धक्का! निवडणुकीआधी ‘या’ खेळाडूच्या हाती भाजपाचा झेंडा

Boxer Vijender Singh Joins BJP : लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच काँग्रेसला पुन्हा (Congress Party) एक मोठा धक्का (Boxer Vijender Singh Joins BJP) बसला आहे. बॉक्सर विजेंद्र सिंहने दिल्ली (Vijender Singh) भाजपचे मुख्यालय गाठून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. काही काळापूर्वी बॉक्सर विजेंद्र सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते की जनतेची इच्छा असेल तर मी त्या ठिकाणी जाण्यास तयार आहे.

विजेंद्रने 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्याने पहिल्याच निवडणुकीत पराभव स्वीकारला होता तेव्हापासून तो काँग्रेसमध्ये कार्यरत होता. डिसेंबर 2023 मध्ये राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चाही सुरू झाली होती. परंतु या चर्चा नंतर केवळ अफवा होत्या हे सिद्ध झाले. आता विजेंद्रने राजकारणाची पुन्हा नव्याने सुरूवात केली आहे यावेळी मात्र त्याने पक्ष बदलला आहे. भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून नव्याने राजकारणाची सुरुवात करीत आहे.

Congress Second List : काँग्रेसची दुसरी यादीही जाहीर; ‘या’ माजी मु्ख्यमंत्र्यांच्या मुलांना तिकीट

Boxer Vijender Singh Joins BJP

विजेंद्र सिंहने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण दिल्ली मतदारसंघातून नशीब आजमावले होते. परंतु या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. मथूरा येथून पक्षाचे उमेदवार म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याचे नाव चर्चेत होते. या मतदारसंघातून भाजपने अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमामालिनी यांना पुन्हा तिकीट दिले आहे. विजेंद्र सिंह हा जाट समुदायातून येतो. हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील काही मतदारसंघात विजेंद्र सिंह यांचा मोठा राजकीय प्रभाव आहे. आता भारतीय जनता पार्टीत त्यानो प्रवेश केल्याने भाजपला काही प्रमाणात फायदा तर निश्चितच होणार आहे.

काँग्रेसने दिले माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना तिकीट 

मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांना जालौर मतदारसंघातून तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांन जोरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत जवळपास 60 नावांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर 40 पेक्षा जास्त नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Leave a Comment