Bosch Ltd Share । हल्ली अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करतात. काही शेअर्स असे आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा देतात. जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण रेकॉर्ड डेटवर 1 शेअरवर 205 रुपयांचा लाभांश मिळत आहे.
कंपनी करणार आज रेकॉर्डची तपासणी
शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने असे सांगितले होते की या 1 शेअरवर 205 रुपये लाभांश देण्यात येईल. या लाभांशासाठी घोषित केलेली रेकॉर्ड तारीख 23 फेब्रुवारी 2023 असून म्हणजेच आज ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स धारण केले आहेत त्यांचा फायदा होणार आहे. हे लक्षात घ्या की, रेकॉर्ड डेट म्हणजे ती तारीख ज्या दिवशी कंपनी आपल्या रेकॉर्डमधील गुंतवणूकदारांची नावे तपासते.
केला जातोय 2001 पासून लाभांश वितरीत
या पद्धतीने कंपनी सातत्याने मोठा लाभांश देत असून 2023 मध्ये, कंपनीकडून दोनदा प्रति शेअर 480 रुपये लाभांश देण्यात आला होता. बॉश लिमिटेडने 21 एप्रिल 2001 रोजी प्रथम एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यापार केला होता. त्यानंतर कंपनीने पात्र गुंतवणूकदारांमध्ये 31 रुपयांचा लाभांश वितरित करण्यात आला होता. तेव्हापासून आजही लाभांश वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
शेअर बाजारात उत्तम कामगिरी
किमतीचा विचार केला तर गुरुवारी कंपनीच्या एका शेअरची किंमत 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 28465.15 रुपयांच्या पातळीवर बंद झाली आहे. मागील एका वर्षात, कंपनीने शेअर बाजारातील स्थानबद्ध गुंतवणूकदारांना 55 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. तर त्याचवेळी, अवघ्या एका महिन्यात बॉश लिमिटेडच्या शेअर्सची किंमत 25 टक्क्यांनी वाढली आहे.
शेअर बाजारात कंपनीची 52 आठवड्यांची उच्च पातळी 29,199.95 रुपये प्रति शेअर आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 17,490.90 रुपये प्रति शेअर असून कंपनीचे मार्केट कॅप 83,954.97 कोटी रुपये आहे.