दिल्ली – पंजाब निवडणुकीतील (Punjab election) घवघवीत विजयानंतर उत्साहात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (AAP) गुजरातकडे (Gujarat)आपले लक्ष वळवले आहे.

गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा गृहप्रदेश आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी भगवंत मान यांच्यासोबत केजरीवाल यांनी आज अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली आणि शहरातील रोड शोमध्ये भाग घेतला. यादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ला संधी द्या, असे सांगितले.

केजरीवाल म्हणाले की, भगवंत मान यांचे सरकार पंजाबमध्ये सत्तेवर आल्यानंतर दहा दिवसांत भ्रष्टाचार संपला आहे. दिल्लीतही असेच घडले आहे. गुजरातमध्येही लाच मागितली जाते का, असा प्रश्न त्यांनी जनतेतून उपस्थित केला, तेव्हा जनतेने होकारार्थी उत्तर दिले. गुजरातमध्ये भाजपने 25 वर्षे राज्य केले आहे, आता आम आदमी पक्षाला संधी मिळावी, जेणेकरून येथेही प्रामाणिक व्यवस्था निर्माण होईल.

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या निवडणूक प्रचाराची ही सुरुवात मानली जात आहे. गुजरातमधील निवडणुकांना अजून नऊ महिने बाकी असून त्याची कसरत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होऊ शकते. तत्पूर्वी केजरीवाल साबरमती आश्रमात पोहोचले होते. केजरीवाल आणि भगवंत मान यांनी चरखा फिरवला होता.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी साबरमती आश्रमातील पाहुण्यांच्या पुस्तकात आपले विचार नोंदवले. आश्रमाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चरख्याची प्रतिकृती आणि महात्मा गांधींच्या जीवनाशी संबंधित पुस्तके भेट दिली. केजरीवाल म्हणाले, ‘दिल्लीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच साबरमती आश्रमात आलो आहे. मी समाजसेवक असताना या ठिकाणी अनेकदा आलो होतो. प्रत्येक वेळी मी इथे येतो तेव्हा मला मनःशांती मिळते.

Share.

Leave A Reply

Exit mobile version