BJP : नवी दिल्ली : हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी (Himachal Pradesh Elections) भारतीय जनता पक्षाने (BJP) 62 उमेदवारांची (Bjp Announced 62 Candidate) नावे जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर (CM Jayram Thakur) सिराज मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत, तर अनिल शर्मा यांना मंडीतून तिकीट देण्यात आले आहे. उनामधून सतपाल सिंग सत्ती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांना तिकीट देण्यात आलेले नाही. अनुरागचे सासरे गुलाब सिंग यांनाही तिकीट नाकारण्यात आले आहे. 2017 च्या निवडणुकीत दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. भरमौरमधून डॉ. झनक राज, चंबामधून इंदिरा कपूर, डलहौसीमधून डी. एस. ठाकूर, भटियालमधून विक्रम जरीयाल, नूरपूरमधून रणवीर सिंग, इंदोरामधून रीता धीमान, फतेहपूरमधून राकेश पठानिया, जावळीमधून संजय गुलेरिया, जसवान-प्रांगपूरमधून विक्रम ठाकूर, जयसिंगपूरमधून रविंदर धीमान यांना तिकीट देण्यात आले आहे.
नगरोटामधून अरुणकुमार मेहरा (कुका), कांगडामधून पवन काजल, शाहपूरमधून सरबीन चौधरी, धर्मशालामधून राकेश चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालमपूरमधून त्रिलोक कपूर, बैजनाथमधून मुलखराज प्रेमी, लाहौल आणि स्पितीमधून रामलाल मार्कंडेय यांना विश्वास दाखविण्यात आला आहे.
मनालीमधून गोविंद सिंह ठाकूर, बंजारमधून सुरेंदर कुमार, कारसोगमधून दीपराज कपूर, सुंदरनगरमधून राकेश जंबो, नाचनमधून विनोद कुमार, दरंगमधून प्रकाश राणा,धरमपूरमधून रजत ठाकूर, मंडीमधून अनिल शर्मा यांना तिकीट मिळाले आहे. या व्यतिरिक्त अन्य जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
- Read : BJP New Plan : मिशन दक्षिणसाठी प्लान तयार; ‘या’ राज्यात भाजप करणार मोठा उलटफेर
- AAP : आपमध्ये खळबळ..! आमदारांबाबत काँग्रेसने केला ‘हा’ दावा.. जाणून घ्या, राजकीय अपडेट
- Himachal Pradesh Election 2022 : भाजप-काँग्रेसच्या ‘त्या’ लोकांवर आम आदमीचा वॉच; पहा, काय आहे निवडणूक प्लान..
- Congress President Election : काँग्रेससाठी आज महत्वाचा दिवस; ‘या’ उमेदवारांचे भवितव्य ठरणार..