JP Nadda : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला, सर्व्हिस सेंटरमधून झाली गायब

JP Nadda : सत्ताधारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  जेपी नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांची कार सर्व्हिस सेंटरमधून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हिसिंगसाठी ही कार सर्व्हिस सेंटरमध्ये ड्राइव्हरने घेऊन गेली होती आणि तेथून ही चोरी झाली.

ड्राइव्हर जोगिंदरच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. 19 मार्च रोजी ही चोरीची घटना  घडल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील एका सर्व्हिस सेंटरमधून अवघ्या काही मिनिटांत ही कार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची कार दिसली

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्राइव्हर जोगिंदरने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार सर्व्हिसिंगसाठी आणली होती. कार सर्व्हिस सेंटरमध्ये जमा केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर गेला आणि काही वेळातच गाडी गायब झाली. पोलीस सर्व्हिस सेंटर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सीसीटीव्हीमध्ये वाइट रंगाची फॉर्च्युनर कार बाहेर जाताना दिसत आहे. कार सर्व्हिस सेंटरच्या बाहेर नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

ग्राहकांना होणार फायदा! बाजारात येत आहे ‘ह्या’ 3 शानदार कार्स

ही कार गुडगावकडे जाताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली आणि गुडगावच्या सीमेवर कार चोरीच्या टोळ्या सक्रिय असल्याच्या घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत.

दिल्लीत कार चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे

दिल्लीत कार चोरीच्या घटना वाढल्या आहेत. इको डिजिटल इन्शुरन्सच्या ‘थेफ्ट अँड द सिटी 2024‘ अहवालानुसार, 2022 च्या तुलनेत राजधानीत कार चोरीच्या घटनांमध्ये 2.5 पट वाढ झाली आहे. दिल्लीत दर 14 मिनिटांनी एक कार चोरीला जाते. पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही दिल्लीत कार चोरांची टोळी सक्रिय आहे.

नागरिकांनो, 31 मार्चपूर्वी ‘ही’ कामे पूर्ण करा, पुन्हा मिळणार नाही संधी

Leave a Comment