मुंबई : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. संसदीय मंडळाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या विधानसभेतील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निरीक्षक आणि सह-निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पर्यवेक्षकांच्या यादीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचाही समावेश आहे.
गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवर दास यांची उत्तर प्रदेशचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजनाथ सिंह यांना उत्तराखंडचे निरीक्षक बनवण्यात आले आहे. केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू आणि केंद्रीय अर्थमंत्री मणिपूरसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री एल. मुरुगन यांना गोव्यासाठी निरीक्षक बनवण्यात आले आहे.
दरम्यान, देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. चार राज्यात भाजपने जबरदस्त विजय मिळवला आहे. त्यामुळे या राज्यात आता भाजपने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. अद्याप याबाबत काहीही स्पष्ट नाही. गोव्यात मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर वाद सुरू आहेत. तर उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे समोर आली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदी आदित्यनाथ हेच कायम राहणार आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री पदासाठी यावेळी जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. यावेळी तर भाजपने राज्यात 4 उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा विचार सुरू केला आहे.
हे तर भाजपने लोकांना दिलेले ‘रिटर्न गिफ्ट’..! ‘त्या’ मुद्द्यावर काँग्रेसची भाजपवर खरमरीत टीका..