BJP । भाजपला पुन्हा मोठा धक्का; माजी मंत्र्यांनी दिला राजीनामा, ‘या’ पक्षात करणार प्रवेश

BJP । महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत असते. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीत इनकमिंग सुरु झाली आहे. विधानसभेपूर्वी महायुतीतील अनेक राजकीय नेते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत आहेत.

अशातच आता नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे भगदाड पडले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता नांदेडमध्ये डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भाजपला रामराम केला आहे.

एकीकडे नांदेडमध्ये भाजपची ताकद वाढत आहे तर दुसरीकडे भाजपला एकामागून एक दोन धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला होता. आता माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याचा परिणाम आगामी काळात होऊ शकतो.

दरम्यान, दहा वर्षांपूर्वी माधवराव पाटील किन्हाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तरीही किन्हाळकर यांना मागील दहा वर्षात भाजपने कुठलीही जबाबदारी दिली नाही. त्यामुळे ते पक्षात नाराज होते.अखेर आज किन्हाळकर यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. आता ते पुन्हा एकदा शरद पवार गटात जाऊ शकतात. यामुळे शरद पवार गटाची ताकद आणखी वाढू शकते.

Leave a Comment