BJP Fifth Candidate List : पाचव्या यादीत भाजपाचा माइंडगेम! तब्बल ‘इतक्या’ खासदारांना तिकीट नाकारले

BJP Fifth Candidate List : भारतीय जनता पार्टीने रविवारी उमेदवारांची पाचवी यादी (BJP Fifth Candidate List) जाहीर केली. या यादीत पक्ष नेतृत्वाने अनेक विद्यमान खासदारांना चांगलाच दणका दिला. जवळपास 23 खासदारांचे तिकीट कापण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे तर पौराणिक मालिका रामायणातून घराघरात पोहोचलेले अरुण गोविल (Arun Govil) यांना मेरठ मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे.

पिलभितचे विद्यमान खासदार वरुण गांधी, गाझियाबाद येथील वीके सिंह यांच्यासह 23 खासदारांना नारळ देण्यात आले. वरुण गांधी यांचे तिकीट (Varun Gandhi) कापले असले तरी त्यांच्या आई मेनका गांधी यांना (Menka Gandhi) सुलतानपूर मधून उमेदवारी मिळाली आहे. पाचव्या यादीत ओडिशातील संबलपूर मधून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पुरी मतदारसंघातून संबित पात्रा यांना संधी मिळाली आहे. या यादीत एकूण १११ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

Lok Sabha Election : MVA मध्ये ‘या’ 4 जागांवरून रस्सीखेच, राहुल गांधी करणार चर्चा; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

BJP Fifth Candidate List

उत्तर प्रदेशातून १३ नावांची घोषणा केली आहे. सहारनपूर मधून राघव लखनपाल, सर्वेश सिंह यांना मुरादाबाद, मेरठच्या विद्यमान खासदारांऐवजी अरुण गोविल, गाझियाबाद मधून अतुल गर्ग, अलीगढमधून खासदार सतीश गौतम, हाथरसमधून नवीन चेहरा अनुप वाल्मिकी, बदायुंमधून विद्यमान खासदार संघमित्रा मौर्य यांच्याऐवजी दुर्विजय सिंह शाक्य, बरेलीमधून छत्रपाल सिंह गंगवार, पिलभितमधून खासदार वरुण गांधी यांच्याऐवजी जितीन प्रसाद, सुलतानपूरमधून मेनका गांधी, कानपूर मतदारसंघातून खासदार सत्यदेव पाचौरी यांच्याऐवजी रमेश अवस्थी, बाराबंकीमधून विद्यमान खासदार उपेंद्र रावत यांच्याऐवजी राजाराणी रावत, बहराईचमधून खासदार अक्षायबार लाल यांच्याऐवजी अरविंद गौड यांना संधी देण्यात आली आहे.

हरियाणात सुद्धा दणका

हरियाणातील चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. येथे भाजपच्या एका उमेदवाराचे तिकीट कापण्यात आले आहे. तसे पाहिले तर तीन खासदार बदलले आहेत. एका जनाला मुख्यमंत्री केले तर एका जणाने पक्षाला सोडचिठ्ठी दिली. कुरुक्षेत्र मतदारसंघातून नवीन जिंदाल यांना उमदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होण्याच्या अर्धा तास आधीच काँग्रेसचा राजीनामा देऊन जिंदाल भाजपमध्ये आले होते. कुरुक्षेत्र येथील खासदार नायब सिंह सैनी यांना भाजपने सीएम केले आहे.

हिसार येथील खासदार ब्रजेंद्र सिंह यांच्या जागी रणजित चौटाला यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. ब्रजेंद्र सिंह यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चौटाला सध्या हरयाणा सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनीही नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. सोनीपत येथील खासदार रमेश चंद्र कौशिक यांच्या जागी मोहन लाल बडोली यांना तर रोहतक येथून विद्यमान खासदार अरविंद कुमार शर्मा यांना तिकीट मिळाले आहे.

Lok Sabha Election 2024 : आता भाजपविरोधात लढणार! ‘या’ कारणांमुळे BJP-BJD युती होण्याआधीच ब्रेक

BJP Fifth Candidate List

हिमाचल प्रदेशातील कांगडा मतदारसंघातून राजीव भारद्वाज यांना तिकीट मिळाले आहे. येथे खासदार किशन कपूर यांना भाजपने धक्का दिला आहे. मंडी मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) संधी मिळाली आहे.

बिहारमध्ये तीन खासदरांना डच्चू 

बिहारमधील 17 लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. येथील 3 खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बाकीच्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. गुजरातमधील आणखी सहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पाच खासदारांना संधी नाकारली आहे. झारखंड आणि कर्नाटकातही प्रत्येकी 3 मतदारसंघात विद्यमान खासदारांना तिकीट नाकारले आहे.

Leave a Comment