BJP Candidates Second List : भाजपाकडून दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ उमेदवारांना मिळालं तिकीट

BJP Candidates Second List : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची (BJP Candidates Second List) दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. तसेच या यादीत अनेक दिग्गज नेते आणि केंद्रातील मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. पूर्व दिल्ली मतदारसंघात हर्ष मल्होत्रा आणि उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून योगेंद्र चंदोलिया यांना तिकीट दिले आहे. दादर नगर हवेली या मतदारसंघात कलाबेन देलकर यांना उमेदवारी मिळाली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथून संधी देण्यात आली आहे. तर धारवाडमधून प्रल्हाद जोशी, नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, करनालमधून हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, सिरसा मतदारसंघातून अशोक तंवर यांसारख्या दिग्गज नेत्यांना रिंगणात उतरवले आहे.

BJP Candidate List : कुणाची निवृत्ती तर कुणी नाकारलं तिकीट? भाजपाच्या ‘या’ शिलेदारांनी सोडलं निवडणुकीचं मैदान

BJP Candidates Second List

भाजपाच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी, गृहमंत्री अमित शाह यांना गांधीनगर तर रक्षामंत्री राजनाथ सिंह यांना लखनऊ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या यादीत तीन मंत्र्यांना दणका बसला होता. त्यांना तिकीट दिले नव्हते. या यादीत उत्तर प्रदेश 51, पश्चिम बंगाल 20, मध्य प्रदेश 24, गुजरात आणि राजस्थान प्रत्येकी 15, केरळ आणि तेलंगाणा प्रत्येकी 12, झारखंड, छत्तीसगड आणि आसाम राज्यांतील प्रत्येकी 12 जागा आणि दिल्लीतील पाच जागांसह काही अन्य राज्यांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.

यानंतर आता भाजपने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना तिकीट मिळालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीत नव्हतं. दुसऱ्या यादीत मात्र त्यांचं नाव आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट मिळालं आहे. रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच संधी मिळाली आहे. तर नंदूरबार मतदारसंघातूनही विद्यमान खासदार हीना गावित यांना तिकीट मिळालं आहे.

Congress First List : दिग्गज अन् ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसच्या प्लॅनिंग नेमकं काय?

BJP Candidates Second List

जालनामधून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, सांगलीतून संजय काका पाटील, माढा मतदारसंघातून रणजित निंबाळकर, धुळ्यातून सुभाष भामरे, उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उत्तर पूर्व मतदारसंघातून मिहीर कोटेचा, नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर, नगर दक्षिण मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे यांना तिकीट मिळालं आहे.

लातूर मतदारसंघातून सुधाकर श्रुंगारे, जळगावमधून स्मिता वाघ, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील, वर्धा मतदारसंघातून रामदास तडस, अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे.

Leave a Comment