BJP Candidate List : जुन्या शिलेदारांवर विश्वास; महाराष्ट्रात धक्कातंत्राचा ‘सावध’ प्रयोग

BJP Candidate List for Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (BJP Candidate List for Lok Sabha Election 2024) दोन दिवसांपूर्वी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांना तिकीट देण्यात आले. या यादीत भाजपने धक्कातंत्राचा फारसा वापर केला नाही. उलट जुने आणि विश्वासू नेते नाराज होणार नाहीत याची विशेष काळजी घेतली. फक्त पाच खासदारांचा अपवाद वगळता बाकीच्या खासदारांना पुन्हा संधी दिली आहे.

भाजपाच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री आणि दिग्गज नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव नव्हते त्यामुळे आता त्यांना तिकीट मिळणार की नाही असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता, उद्धव ठाकरे यांनी (Uddahv Thackeray) तर गडकरींना पक्ष प्रवेशाची ऑफरच देऊन टाकली. परंतु दुसऱ्या यादीत गडकरींना तिकीट मिळाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

BJP Candidate List for Lok Sabha Election 2024

Rahul Gandhi : मोदींवरील टीका भोवली! राहुल गांधींना निवडणूक आयोगाची तंबी; नेमकं काय घडलं?

भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीवर नजर टाकली तर लक्षात येते की भाजपने धक्कातंत्राचा जो प्रयोग दुसऱ्या राज्यात केला तसा महाराष्ट्रात केला नाही. गोपाळ शेट्टी, प्रीतम मुंडे, मनोज कोटक, संजय धोत्रे आणि उन्मेष पाटील या पाच खासदारांचा पत्ता कट करण्यात आला. मात्र अन्य 13 खासदारांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. यातून पक्षाने जुन्या शिलेदादांवर पुन्हा विश्वास दाखवल्याचे दिसून येत आहे.

पुन्हा तिकीट दिलेल्या खासदारांमध्ये सुभाष भामरे, प्रतापराव चिखलीकर, सुजय विखे, संजय काका पाटील, भारती पवार, रक्षा खडसे, हिना गावित, रामदास तडस, सुधाकर श्रृंगारे, रणजित निंबाळकर, रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि नितीन गडकरी यांचा समावेश आहे. या विद्यमान खासदारांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे. हे सर्व खासदार आता पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. या व्यतिरिक्त भाजपने ज्या पाच खासदारांचे तिकीट कापले आहे त्यांचे कसे पुनर्वसन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

BJP Candidate List for Lok Sabha Election 2024

BJP Candidate List 2024 : चित्रपट ‘स्टार्स’ निवडणुकीच्या रिंगणात; पहा, कुणाकुणाला भाजपनं दिलं तिकीट?

Leave a Comment