BJP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने 195 उमेदवारांची (BJP Candidate List) पहिली यादी जाहीर केली. या यादीत अनेक दिग्गजांना पुन्हा तिकीट दिले तर काही दिग्गजांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला. तिकीट मिळालेल्या उमेदवारांच्या यादीत काही चित्रपट अभिनेत्यांचाही समावेश आहे. तिकीट मिळाल्यानंतर या उमेदवारांनी पुढील तयारीला सुरुवात (Lok Sabha Election) केली आहे. पण, यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या राजकारणात असेही काही लोक आहेत ज्यांनी निवडणुकीच्या आधी एकतर उमेदवारीच नाकारली नाहीतर राजकारणातूनच निवृत्ती जाहीर केली. असे कोण नेते आहेत ज्यांनी राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला त्याची माहिती घेऊ या…
Elections 2024 : भाजपाचा ‘माइंडगेम’ अन् नेत्यांचा सोशल मीडिया अपडेट; “मोदी का परिवार”चं कारण काय?
पवन सिंह
भोजपुरी अभिनेता पवन सिंह याला पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून तिकीट दिले होते. या मतदारसंघात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत गायक आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो या मतदारसंघातून जिंकले होते. त्यानंतर राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत उतरवले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर 2021 मध्ये पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी विजय मिळवला. त्यावेळी सुद्धा त्यांच्या विरोधात पवन सिंह हेच मैदानात होते. यावेळी भाजपाने त्यांनाच पुन्हा तिकीट दिले होते. मात्र, यानंतर पवन सिंहने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत काही कारणांमुळे निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले.
BJP Candidate List
उपेंद्र सिंह रावत
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील खासदार उपेंद्र सिंह रावत यांनी सुद्धा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपे पहिल्या यादीत रावत यांची उमेदवारी नक्की केली होती. परंतु, त्यांनीही सध्या निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
BJP Candidate List 2024 : चित्रपट ‘स्टार्स’ निवडणुकीच्या रिंगणात; पहा, कुणाकुणाला भाजपनं दिलं तिकीट?
BJP Candidate List
नितीन पटेल
गुजरात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपने अद्याप मेहसाणा मतदारसंघात कुणालाही तिकीट दिलेले नाही. येथे भाजपाचा उमेदवार कोण असेल यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. नितीन पटेल यांनी माघार घेतल्यानंतर आता या मतदारसंघात कुणाला तिकीट मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गौतम गंभीर, जयंत सिन्हा
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीने पहिली यादी जाहीर करण्याआधीच गंभीरने निवृत्तीची घोषणा करत मोठा धक्का दिला. क्रिकेटकडे जास्त लक्ष केंद्रीत करणार असल्याचे कारण त्याने यासाठी दिले आहे. तर दुसरीकडे जयंत सिन्हा यांनीही जागतिक हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत उमेदवारी नाकारली. परंतु, या दोघांनाही यंदा भाजपकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू होत्या.
Onion smugglers । स्मगलर्स जोमात; मोदी सरकार जोशात.. कांदा उत्पादक संकटात
BJP Candidate List
माजी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनाही यंदा तिकीट मिळाले नाही. यानंतर त्यांनी थेट राजकारणातून निवृत्तीच जाहीर करून टाकली. दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघातून ते विजयी झाले होते. परंतु, यंदा तिकीट न मिळाल्याने त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली. आता आगामी काळात आपल्या क्लिनिकवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. BJP Candidate List