BJP Candidate List 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची (BJP Candidate List 2024) पहिली यादी शनिवारी जाहीर केली. या यादीत 17 राज्यांत 195 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा (PM Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना (Amit Shah) पक्षाने गांधीनगर मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. याच बरोबर 34 केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. तसेच अभिनय क्षेत्रातील काही सेलिब्रिटी मंडळींनाही मैदानात उतरवले आहे. भोजपुरी अभिनेता पवन सिंह याला (Pawan Singh) पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र त्याने निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.
रवी किशन
2019 च्या निवडणुकीत अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) गोरखपूरमधून निवडणूक जिंकले होते. पक्षाने पुन्हा त्यानांच तिकीट दिले आहे. अभिनेत्यापासून राजकारणी बनलेल्या रवी किशन यांना भोजपुरी सिनेमातील अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाते. तेरे नाम या चित्रपटानंतर रवी किशन यांना अभिनय क्षेत्रात यश मिळत गेले.
BJP Candidate List 2024
मनोज तिवारी
सन 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून मनोज तिवारी (Manoj Tiwari) विजयी झाले आहेत. 2014 मध्ये तिवारी यांनी आम् आदमी पार्टीचे उमेदवार आनंद कुमार यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. यावेळी अशी चर्चा होती की त्यांना बिहारमधील एखाद्या मतदारसंघातून तिकीट दिले जाईल. परंतु या चर्चा खोट्या ठरल्या आहेत. पक्षाने मनोज तिवारी यांना पुन्हा उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
दिनेश लाल यादव ‘निरहूआ’
भोजपुरी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेते निरहूआ 2019 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी (Akhilesh Yadav) त्यांचा पराभव केला होता. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. या नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत निरहुआ यांनी अखिलेश यादव यांचे बंधू धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला.
BJP Candidate List 2024
हेमा मालिनी
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी तिसऱ्यांदा (Hema Malini) मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. सध्या हेमा मालिनी चित्रपटांपासून दूर आहेत पण राजकारणात मात्र सक्रिय आहेत. जॉनी मेरा नाम या चित्रपटानंतर हेमा मालिनी यांना अभिनय क्षेत्रात यश मिळत गेले.
लॉकेट चटर्जी
लॉकेट चटर्जी यांनी अनेक बंगाली चित्रपटात काम केले आहे. चटर्जी आधी तृणमूल काँग्रेसमध्ये होत्या. सन 2015 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2016 मध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्या हुगळीमधून खासदार बनल्या. 2021 त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावले परंतु यावेळीही त्यांचा पराभव झाला. बंगाली अभिनय क्षेत्रात सुद्धा लॉकेट चटर्जी यांचा मोठा दबदबा आहे.
सुरेश गोपी
मल्याळम चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आणि भाजप नेते सुरेश गोपी 2016 मध्ये (Suresh Gopi) राज्यसभेचे खासदार झाले. याच वर्षी ते भाजपात सहभागी झाले होते. 2019 मध्ये त्यांनी त्रिशुर मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला. आता याच मतदारसंघातून भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. सुरेश गोपी मल्याळम चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. BJP Candidate List 2024