BJP Agrocos Kisan Morcha: पुणे (Pune News): केंद्रात एकहाती आणि राज्यात शिवसेनेच्या साथीने सत्तेत असेलल्या भाजपने आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीची (BJP Election strategy for 2024 Loksabha) तयारी केली आहे. तसेच यासह महाराष्ट्र आणि इतर प्रमुख राज्यामधील विधानसभा (Maharashtra Vidhansabha) निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील कृषी व संलग्न पदवीधर (Agriculture / Horticulture Degree) व पदविकाधारक (Diploma Student) यांना पक्षाच्या मुख्य विचारधारेशी जोडण्यासाठी ‘भाजपा ॲग्रीकॉस किसान मोर्चा’ यांच्यातर्फे खास धोरण तयार केले आहे. त्यासाठी नगर जिल्ह्यातील नितीन नवनाथ उदमले (Nitin Udamale) यांना प्रदेश सहसंयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.
नितीन उदमले हे स्वत: कृषी पदवीधर असून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामध्ये गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे. समाजकारण आणि राजकारणाद्वारे देशाच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार घेऊन त्यांनी भाजपबरोबर काम सुरू केले. विविध व्यासपीठावर पक्षाची विचारधारा आणि धोरण याबद्दल माहिती देऊन कार्यकर्त्यांना जोडण्यासाठीचे काम उदमले यांनी केले आहे. याच कार्याची दखल घेऊन आणि त्यांचा कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. भाजप पक्षाची शेतकऱ्यांशी संपर्क करण्याची नवीन यंत्रणा उभा करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदेश पातळीवर ‘भाजपा ॲग्रीकॉस किसान मोर्चा’ नावाचे नवीन आयाम सुरु करण्यात आलेले आहे.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
गुरुवारी (दिनांक 16 मार्च 2023) भाजप प्रदेश कार्यालयात नितीन उदमले यांच्यावर संघटनात्मक कार्याची ही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, विधानपरिषद नेते आमदार प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, प्रदेश संघटन सचिव विक्रांत पाटील यांच्या उपास्थितीत ही घोषणा करण्यात आली व नियुक्ती पत्र देण्यात आले. या नव्या आयामाच्या माध्यमातून कृषी, कृषी अभियांत्रिकी, पशुवैद्यक, वन, मत्स्य आदि विषयातील पदवीधर आणि पदविकाधारकांना संघटित केले जाणार आहे. त्याद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, शेतीसाठीचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, पक्षाचे कृषीविषयक धोरण व निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, सरकारच्या कृषीविषयक योजनांची परिणामकरक अंमलबजावणी करणे, पक्षाच्या विरोधात केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देणे आदि उद्देश ठेवण्यात आले आहेत. या माध्यमातून राज्यभरातील कृषी पदवी आणि पदविका धारकांचे जिल्हा व तालुका स्तरावर संगठन करण्यात येणार आहे.