Bike Servicing Tips : जर तुम्ही तुमची मोटारसायकल सर्व्हिसिंगसाठी (Bike Servicing Tips) घेऊन जाऊ शकत नसाल तर तुम्ही पैसे खर्च न करता तुमची दुचाकी घरीही स्वच्छ करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्या जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही तुमची दुचाकी घरी आरामात साफ करू शकता. त्याबद्दल अधिक माहिती घेऊ या..
वॉशिंग
जर तुम्हाला तुमची दुचाकी घरी साफ असेल तर आधी वॉशिंग करणे आवश्यक आहे. यामुळे दुचाकीवरील कचरा धुळ तुम्ही सहज काढू शकता. एकदा का दुचाकी स्वच्छ केली की मग सर्व्हिसिंगचा एक टप्पा पूर्ण होतो.
हार्ड ब्रशिंग
जेव्हा तुम्ही तुमची दुचाकी पाण्याने धुता तेव्हा तुम्ही चेन कव्हर आणि इतर भाग देखील पूर्णपणे स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला हार्ड ब्रश करावा लागेल. या ब्रशने तुम्ही लोखंडी भागांवर साचलेली घाण सहज साफ करू शकता. हे देखील खूप महत्वाचे आहे.
ल्युब्रिकेशन
दुचाकीचे चेन कव्हर आणि चेन गंजण्यापासून वाचवण्यासाठी स्मूथ राइडिंगसाठी वंगण आवश्यक आहे, चांगल्या दर्जाचे ल्युब्रिकेशन स्प्रे वापरा आणि काही भागावर लावा. कारण घाणीमुळे गंजण्याची शक्यता वाढते.
बॅटरी आणि स्पार्क प्लग
बॅटरी आणि स्पार्क प्लग हे दोन्ही मोटारसायकलचे महत्वाचे पार्ट आहेत. तुम्ही जास्त प्रयत्न न करता ते काढू शकता. जर तुम्हाला बाईक सुरू करण्यात अडचण येत असेल, तर दोन्ही नीट स्वच्छ करा आणि पुन्हा दुरुस्त करा. कारण स्पार्क प्लगवर कार्बन जमा होतो ज्यामुळे बॅटरीच्या बाबतीतही असेच घडते. अशा स्थितीत त्यांची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे.