Bike buying tips : सावधान! स्वस्तात बाईक खरेदी करणे पडेल महागात, लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Bike buying tips : काही दिवसांपासून बाईकच्या किमती खूप वाढल्या आहेत. नवीन बाईक खरेदी करणे अनेकांना परवडत नसल्याने ते सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करतात. पण तुम्हीही अशी बाईक खरेदी करणार असाल तर वेळीच सावध व्हा. अनेकांना स्वस्तातली बाईक करताना मोठा फटका बसतो. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

बाईक तपासून पहा

तुम्ही कोणतीही बाईक खरेदी करणार असाल तर त्यापूर्वी ती बाईक नीट तपासून घ्या. बाईकवर काही डेंट्स किंवा स्क्रॅच आहेत की नाही याकडे लक्ष द्या, इतकेच नाही तर बॉडी पेंट काळजीपूर्वक तपासा. समजा सर्व काही ठीक असेल तर पुढे जा आणि बाइकचा इतिहास तपासा.

बाईक चालवून पहा

समजा तुम्ही ती बाईक फायनल करणार असाल तर ती बाईक एकदा चालवण्याचा प्रयत्न करा. कारण त्यावर राइड करून तुम्हाला बाइकच्या अनेक कमतरतांची माहिती मिळून जाईल. इतकेच नाही तर दुचाकीचे टायरही तपासून पहा, टायर खराब झाले असतील तर त्याबाबत विक्रेत्याशी बोला.

एनओसी घ्यावा

तुम्ही फायनल केलेल्या सेकंड हँड बाईकची NOC नक्की घेणे गरजेचे आहे, बाईकवर कोणतेही कर्ज नाही हे देखील लक्षात ठेवा, जर बाईक कर्ज घेऊन खरेदी केली असेल तर तुम्हाला ‘ना हरकत’ घेणे खूप गरजेचे आहे.

बाइकचा इतिहास तपासून पहा

कोणतीही वापरलेली बाईक विकत घेण्यापूर्वी, तिचा पूर्वीचा सर्व्हिस रेकॉर्ड तपासणे खूप गरजेचे आहे. असे केले तर तुम्हाला कळेल की बाईक कधी आणि किती वेळा सर्व्हिस केली आहे. इतकेच नाही तर बाईक नीट तपासा की त्यात काही डेंट आहेत की नाही, हे देखील तपासा की बाईकचा कधी अपघात झाला आहे की नाही, हे देखील तपासून पहा.

Leave a Comment