Bihar Politics News : बिहारमध्ये RJD ला मिळाला नवा मित्र; ‘या’ पक्षाची महागठबंधनमध्ये एन्ट्री!

Bihar Politics News : बिहारच्या राजकारणात आज एक मोठी (Bihar Politics News) घडामोडी घडली. महागठबंधनमधील घटक पक्षांमध्ये लोकसभेच्या जागावाटपात राष्ट्रीय जनता दलाने विकासशील इंसान पक्षाला (व्हीआयपी) सोबत घेतले आहे. मुकेश सहनी यांच्या (Mukesh Sahani) विकासशील इंसान पक्षाला मागील वेळेप्रमाणे तीन जागा देण्यात आल्या आहेत. विकासशील इंसान पार्टीचे मुकेश सहनी यांना अखेर महागठबंधन मध्ये सामावून घेण्यात आले. सुरुवातीला मुकेश सहनी भाजपप्रणित एनडीए किंवा महागठबंधनबरोबर चर्चा करू शकले नाहीत. आता मात्र लालू प्रसाद यादव यांच्या (Lalu Prasad Yadav) राजदने त्यांना बरोबर घेतले आहे.

राजदने आपल्या कोट्यातून तीन जागाही दिल्या आहेत. व्हीआयपीप्रमुख मुकेश सहनी यांचा खडगिया मतदारसंघामधून गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. यावेळी ही जागा सीपीएमच्या खात्यात गेली आहे. झंझारपूर, गोपालगंज आणि मोतीहारी या जागा मुकेश सहनी यांच्या व्हीआयपीला देण्यात आल्या आहेत. आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी पक्ष कार्यालयातील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मागील निवडणुकीत व्हीआयपी पक्ष महागठबंधनमध्ये सहभागी होता आणि तेव्हाही त्यांना 3 जागा देण्यात आल्या होत्या.

Bihar Lok Sabha Elections : बिहारमध्ये ‘लोजपा’ला धक्का! तब्बल 22 नेत्यांचे राजीनामे; पहा, काय घडलं?

Bihar Politics News

पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव (Tejshwi Yadav) म्हणाले की तुम्ही जे पाहत आहात ते राजकारणातील महत्त्वाचे चित्र आहे. मुकेश सहनी राजकीयदृष्ट्या खूप मजबूत आहेत आणि भविष्यातील आघाडीचे व्हीजन घेऊन आले आहेत आम्ही त्यांचे स्वागत करतो. भाजपने त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. आमची युती बिहार विधानसभेसाठीही राहणार असल्याचे तेजस्वी यादव म्हणाले. विधानसभा निवडणुकीतही आम्ही मुकेश सहनी यांचा आदर करू.

यानंतर मुकेश सहनी म्हणाले, की आज आम्ही महागठबंधनमध्ये सहभागी झालो आहोत. आम्ही लालूप्रसाद यादव यांच्या विचारसरणीवर चालणारे लोक आहोत. भाजपने आमचे आमदार कसे विकत घेतले हे तुम्हाला माहितीच आहे. आमच्या सहकार्याने सरकार स्थापन झाले आणि आम्हाला मात्र बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता आम्ही महागठबंधन मध्ये सहभागी झालो आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 40 पैकी 40 जागा आम्ही जिंकू, असा विश्वास सहनी यांनी व्यक्त केला.

Bihar Politics News

Loksabha Election 2024 : महायुतीसाठी अमित शहा तयार करणार मास्टर प्लॅन, जागावाटपाचा फॉर्म्युला होणार फिक्स?

यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही (PM Narendra Modi) जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी रोजगार आणि आरोग्यावर बोलतात पण, आज गरिबांना रोजगार नाही त्यांच्यावर उपचार देखील केले जात नाहीत अशी टीका त्यांनी यावेळी केली. यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की जे 400 पारचा नारा देत आहेत त्यांना यावेळी बिहारमध्ये पराभूत व्हावे लागेल. बिहारमध्ये धक्कादायक निकाल लागतील. भाजपच्या लोकांना लोकशाही नष्ट करायचे आहे देशातील शांतता भंग करायचे आहे. देशात हुकुमशाही आणण्याचा त्यांचा अजेंडा आहे अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.

Leave a Comment