Bihar Politics : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आल्या आहेत. राजकीय पक्षांची या (Bihar Politics) निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. जागवाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत, तर काही राज्यात जागावाटपाचा अंतिम निर्णय देखील झाला आहे. उत्तर भारतातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील राज्य म्हणजे बिहार. या राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी एनडीए आघाडीमध्ये जागावाटप फायनल झाले आहे. परंतु या जागावाटपामुळेच तेथे सत्ताधारी आघाडीला तडे देखील गेले आहेत. जागावाटपावर नाराज होऊन केंद्रीय मंत्री पशुपती पारस (Pashupati Paras) यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला.
लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या जागा वाटपात सत्ताधारी जेडीयू पक्षाला 16, भाजपला 17 आणि चिराग पासवान यांच्या नेतृत्वातील लोकजनशक्ती पार्टीला पाच जागा मिळाल्या आहेत. परंतु त्यांचे काका केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. या घडामोडींवरून पशुपती पारस कमालीचे नाराज झाले होते. ते कोणत्याही क्षणी राजीनामा देऊन आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाल्या होत्या या चर्चा खऱ्या असल्याचे आज सिद्ध झाले.
Bihar Politics
मंत्री पशुपती पारस यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एनडीए आघाडीमध्ये आमच्या पक्षावर अन्याय झाला असे म्हणत त्यांनी हा राजीनामा दिला आहे. यानंतर पशुपती पारस इंडिया आघाडीसोबत जाणार का, या प्रश्नाची चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपने जेडीयू आणि चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला झुकते माप का दिले, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या परीक्षेत चिराग पास
चिराग पासवान यांच्यासाठी मागील पाच वर्षांचा राजकारण खूप कठीण राहिलं 2020 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांचे वडील रामविलास पासवान यांचे निधन झाले याच दरम्यान व्हिडिओच्या विरोधामुळे बीजेपी ने लोजपाला योग्य जागा दिल्या नाहीत या कारणामुळे चिराग पासवानने विद्रोह करत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती उमेदवारांच्या विरोधात संपूर्ण राज्यात त्यांनी उमेदवार उभे केले होते याचे मोठे नुकसान नितेश कुमार यांना सहन करावे लागले यादरम्यान चिरागपासून भाजपा विरोधात मात्र एकही उमेदवार दिला नव्हता.
Bihar Politics
आजच्या राजकारणात मागील पन्नास वर्षांपासून पशुपती पारस सक्रिय आहेत रामविलास पासवान यांच्याबरोबर त्यांनी पक्षाचे कामकाज देखील केले आहे जेव्हा रामविलास पासवान भाजप आणि आरएसएस यांच्या विरोधात राजकारण करत होते त्यावेळी त्यांचे बंधू पशुपती पारस यांनीही त्यांना मोलाचे साथ दिली होती पशुपती पारस यांचे नितेश कुमार बरोबरही चांगले संबंध आहेत.
Raj Thackeray: अनेकांना लागणार धक्का! राज ठाकरे करणार मोठी घोषणा, भाजपला होणार फायदा?
लोक जनशक्ती पार्टी पक्षात फूट पडण्यासाठी राजकीय जाणकार जीडीयूलाच जबाबदार धरतात पशुपती पारस नितेश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा राहिले आहेत. परंतु ज्यावेळी नितीश कुमार यांनी एनडीए बरोबर फारकत घेतली होती त्यावेळी देखील पशुपती पारस एनडीए मध्ये कायम राहिले होते परंतु जीडीओ बरोबर त्यांचे संबंधात कोणतीही कटुता आली नव्हती पशुपती पारस यांचे संबंध बीजेपी आणि आरएसएस नेत्यांबरोबर फारसे चांगले राहिलेले नाहीत.
चिराग पासवान यांची राजकारणातील सक्रियता आणि रामविलास पासवान यांचा वारसा त्यांच्या कामी आला. चिराग पासवान यांच्या सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी होत असल्याचे पाहून विरोधी महाआघाडीकडून देखील त्यांना मोठ्या ऑफर्स दिल्या जात असल्याची चर्चा होती. पक्षात मोठी फूट पडल्यानंतर चिरागपासून यांनी दिल्लीपासून बिहार पर्यंत मेहनत घेतली चिरागपासून संपूर्ण बिहारच्या दौऱ्यावर निघाले चिराग पासून यांच्या विविध ठिकाणी सभा झाल्या या काळात त्यांच्या सर्वांना तरुणांची मूर्ती गर्दी जमत होती.
Bihar Politics
विधानसभा निवडणुकीत सुमारे 130 उमेदवार उभे करून चेहरा पासवान यांनी आपल्या पक्षाची संघटना स्थापन केली पक्षात फूट पडल्यानंतर ही चिरागपासून यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणाऱ्या मतदारांमध्ये आपली पकड कायम ठेवली बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट यांसारख्या मुद्द्यांवर ते सातत्याने आवाज उठवत आले नितेश कुमार यांच्या सरकारवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता.
चिराग पासवान यांचे भाजप नेत्यांशी चांगले संबंध
चिराग पासून यांची राजकारणात इंट्री फिल्मी दुनियेतून झाली होती राजकारणात आल्यानंतर काही दिवसांनी रामविलास पासवान यांनी राजाला सोबतचे युती तोडून एनडीए मध्ये प्रवेश केला रामविलास पासवान यांच्या या निर्णयात चिरागपासून यांचीही मोठी भूमिका असल्याचे बोलले जात होते बिहार भाजपच्या नेत्यांची त्यांच्या चांगले संबंध आहेत 2020 मध्ये चिरागणे व्हिडिओ सोबतच्या वादा नंतर एकट्याने निवडणूक लढण्याची घोषणा केली होती तेव्हा भाजप आणि आरएसएसशी संबंधित अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.
Bihar Politics
चिराग पासवान हे भविष्यातील राजकारणासाठी भाजपला अधिक उपयुक्त ठरू शकतात बिहारमध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे चेहरा पासवान हे भाजपचे असे मित्र आहेत जे पीएम मोदी आणि अमित शहा यांच्या काळात सतत त्यांच्या सोबत राहिले आहेत बिहारच्या राजकारणात एलजीबीची पाच ते सहा टक्के मते असल्याचे मानले जाते अशा परिस्थितीत बिहारमध्ये सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी चिराग पासवर्ड हे भाजपसाठी मजबूत आधार ठरू शकतात.