Bihar : देशाच्या स्वातंत्र्यदिनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. वास्तविक उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री नितीश यांनी राज्यातील 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय 20 लाख नोकऱ्याही निर्माण होणार आहेत. या घोषणेसह मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन फेटाळल्याचा आरोप केला होता.
10 लाख सरकारी नोकऱ्यांच्या घोषणेवर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आनंद व्यक्त केला आहे. तेजस्वी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आदरणीय मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांनी गांधी मैदान, पाटणा (Patana) येथून ऐतिहासिक घोषणा 10 लाख नोकऱ्यांनंतर 10 लाख अतिरिक्त नोकर्या इतर व्यवस्थेतूनही दिल्या जातील.
बिहारमध्ये सत्तांतर होऊन राजद (RJD) पुन्हा सत्तेत आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपबरोबरील (BJP) आघाडी तोडली. काँग्रेस आणि राजद यांना बरोबर घेत नवीन सरकार स्थापन केले. या सरकारमध्येही नितीश कुमारच मुख्यमंत्री आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांनी शपथ घेतली आहे. या दोन्ही पक्षांनी हात मिळवणी करत भाजपला सत्तेबाहेर केले आहे. त्यानंतर आता या पक्षांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यात दहा लाख सरकारी रोजगार देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा केली असली तरी आता राज्य सरकार यावर कशा पद्धतीने कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.