Virat Kohli : भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली नेहमी चर्चेत असतो. आतापर्यंत कोहलीने अनेक रेकॉर्ड मोडले आहे.
मात्र सध्या सुरू असणाऱ्या वेस्टइंडीज विरुद्ध मालिकेत कोहलीला एक मोठा रेकॉर्ड मोडता आला नाही. याचा मुख्य कारण म्हणजे कोहलीला पहिल्या दोन सामन्यात फलंदाजी मिळाली नाही. चला मग विराट कोहली कोणता विक्रम आपल्या नावावर करू शकला नाही हे जाणून घेऊया.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली इच्छा असूनही मोठा विक्रम करू शकत नाही. खरंतर यामागचं कारण म्हणजे त्याला संघात फलंदाजी मिळत नाहीये.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 114 धावांवर ऑलआऊट झाला. त्यामुळे युवा खेळाडूंना फलंदाजीसाठी पाठवण्यात आले.
त्यामुळे विराटला फलंदाजीची संधी मिळाली नाही. सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माही त्या सामन्यात पाच विकेट पडल्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आले.
पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ कमकुवत संघ मानून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनमधून विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे विराटला या सामन्यातही फलंदाजी करता आली नाही.
विराट कोहली हा विक्रम करणार आहे
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीचा पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आणि त्याचवेळी त्याच्याकडे फलंदाजी आली तर तो मोठी कामगिरी करू शकतो.
जर किंग कोहलीने या सामन्यात 102 धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13000 धावांचा टप्पा पार करेल आणि असा करणारा तो जगातील पाचवा आणि भारताचा दुसरा फलंदाज ठरेल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना 1 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. यावेळी ते मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 हजारांहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी
- सचिन तेंडुलकर – 18426 धावा
- कुमार संगकारा – 14234 धावा
- रिकी पाँटिंग – 13704 धावा
- सनथ जयसूर्या – 13430 धावा
- 5. विराट कोहली – 12898 धावा
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज
- सचिन तेंडुलकर – 18426 धावा
- विराट कोहली – 12898 धावा
- सौरव गांगुली – 11221 धावा
- राहुल द्रविड – 10768 धावा
- एमएस धोनी – 10599 धावा