मुंबई – तेल कंपन्यांनी आज मंगळवार 7 जूनसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Dieses Price Today) जाहीर केले आहेत. स्वस्त झाल्यानंतर सलग 16 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीतील इंडियन ऑइलच्या (Indian Oil) पेट्रोल पंपावर आज पेट्रोलचा दर 96.72 प्रति लिटर आहे आणि डिझेल 89.62 प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली होती, जेणेकरून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील. त्यामुळे पेट्रोलमध्ये 9.5 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. तेव्हापासून तेलाच्या किमती स्थिर आहेत.
दिल्लीत पेट्रोल (Delhi Petrol Price) 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. परभणीत पेट्रोल 114.38 रुपये तर डिझेल 98.74 रुपये दराने विकले जात आहे. श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 113.49 रुपये आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे. पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.04 रुपये आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर या दराने विक्री होत आहे.
.. तर आणखी कमी होणार पेट्रोलचे दर.. तेल उत्पादक देशांनी घेतला ‘हा’ निर्णय.. जाणून घ्या..