Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
या प्रकरणात आता पोलीसांनी मोठी करवाई करत गोरखपूर येथील रहिवासी मनोज राय नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
25 मार्च रोजी धमकीचा फोन आला
खरे तर 25 मार्च रोजी काँग्रेसचे मीडिया संयोजक लल्लन कुमार यांना धमकीचा फोन आला होता. फोन करणार्याने आपली ओळख गोरखपूर येथील रहिवासी मनोज राय अशी दिली. लल्लन कुमार यांना शिवीगाळ करताना त्यांनी प्रथम जातीवाचाक शब्द वापरले.
तसेच गोळ्या घालण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर कॉलरने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. यानंतर लल्लन कुमार यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्याच्या तक्रारीवरून लखनऊच्या चिन्हाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.