Congress News : महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांना धक्का लागला आहे. काँग्रेसच्या नवीन सचिव आणि सहसचिवांची यादी जाहीर करण्यात आली.
ज्यामध्ये असे म्हटले आहे की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या खालील पदाधिकाऱ्यांना संबंधित सरचिटणीस/प्रभारी यांच्यासह AICC सचिव/सहसचिव म्हणून तत्काळ प्रभावाने नियुक्त केले आहे.
पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) सचिव आणि सहसचिवांची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी संबंधित राज्यांतील पक्षाच्या सरचिटणीस आणि प्रभारींशी संबंधित असतील.
बदल कुठे झाले?
काँग्रेस अध्यक्षांच्या कार्यालयातील समन्वयाची जबाबदारी असलेले प्रणव झा आणि गौरव पांधी यांना AICC सचिव करण्यात आले आहे.
पक्षाच्या संपर्क विभागांतर्गत एआयसीसी सचिवाची भूमिका बजावणारे विनीत पुनिया हे यापुढेही ही जबाबदारी पार पाडतील मात्र, त्यांच्यासोबत रुचिरा चतुर्वेदी यांचीही या विभागात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजस्थानमधील दोन माजी आमदार दानिश अबरार यांची दिल्ली आणि दिव्या मदेरणा यांची जम्मू, काश्मीर आणि लडाखसाठी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या माजी कार्यवाहक अध्यक्ष नेता डिसोझा आणि माजी एनएसयूआय अध्यक्ष नीरज कुंदन हे पक्षाचे संघटक सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह AICC सचिव म्हणून काम करतील.
धीरज गुर्जर, प्रदीप नरवाल, राजेश तिवारी आणि तौकीर आलम हे पूर्वीप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये AICC सचिव म्हणून काम पाहतील.
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत शरद यादव यांची कन्या सुभाषिनी यादव यांचीही सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
झारखंड सरकारमधील मंत्री दीपिका पांडे सिंह यांना सचिवपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.
सचिव म्हणून हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी असलेले राज्यसभा सदस्य रंजित रंजन यांनाही या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.
उत्तराखंड विधानसभेचे सदस्य काझी निजामुद्दीन हे सचिव राहतील, परंतु त्यांना राजस्थानऐवजी महाराष्ट्राचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे.