नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एका गोष्टीची जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे, जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग… रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वाहन स्क्रॅपिंग पाॅलिसी जाहीर केली होती. त्यानुसार, 10 वर्षे जुन्या डिझेल कार व 15 वर्षे जुन्या पेट्रोल कार स्क्रॅप करण्याचा नियम करण्यात आला आहे, जो वाहनांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. मात्र, या 10 व 15 वर्षांच्या कालावधीनंतरही वाहन वापरायचे असेल, तर वाहनमालकांना त्या वाहनाचं फिटनेस सर्टिफिकेट बनवावं लागेल. फिटनेस टेस्टमध्ये वाहन फेल झालं, तर मात्र ते ‘स्क्रॅप’ करावं लागणार आहे…
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वाहन स्क्रॅपिंग सुविधा दुरुस्ती नियम- 2022 ची अधिसूचना नुकतीच जारी केली. त्यात मोटार वाहन नियम 23 सप्टेंबर 2021 मध्ये सुधारणा आहेत, जे रजिस्टर्ड वाहन स्क्रॅपिंग फॅसिलिटीच्या स्थापनेसाठी प्रक्रिया निर्धारित करतात. फिडबॅकच्या आधारे नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याद्वारे वाहन मालक, RVSF ऑपरेटर्स, डीलर्स, रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीज अशा सर्व भागधारकांसाठी वाहन स्क्रॅपिंगची प्रक्रिया सुलभ आणि डिजिटली करण्यात आली आहे.
नव्या नियमांनुसार, आता वाहन स्क्रॅपिंगसाठी डिजिटल पद्धतीने अप्लाय करता येणार आहे. वाहन मालक स्क्रॅपिंगसाठी सर्व अर्ज डिजिटली जमा करतील. ‘आरव्हीएसएफ’ (RVSF) वाहनमालकांना त्यांच्या वाहनाच्या स्क्रॅपसाठी डिजिटल पद्धतीने अर्ज करण्यास मदत करण्यासाठी एक सुविधा केंद्र काम करील. शिवाय वाहनमालकाने अर्ज करण्यापूर्वी वाहनाचा डेटा बेस तपासला जाणार आहे.
वाहनाची भाडे-खरेदी, भाडेपट्टी, वाहनावरील कोणतीही थकबाकी वा वाहनाला ब्लॅक लिस्ट केल्याची कोणतीही नोंद प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नोंदीमध्ये नसावी, वाहनाविरुद्ध कोणतीही फौजदारी नोंद नसावी, अशा सर्व स्तरांवर वाहनाची तपासणी केली जाणार आहे. पैकी कोणत्याही प्रकारात वाहन फेल झाल्यास वाहन मालकांचे अर्ज जमा केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
वाहन जमा करताना नि त्यानंतरही संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यासाठी अनेक नियम करण्यात आले आहेत. स्क्रॅपिंगसाठी दिलेल्या वाहनाशी संबंधित प्रमाणपत्रात अधिक डिटेल्स दिले आहेत. हे प्रमाणपत्र वाहन मालकांना डिजटल रुपात उपलब्ध होईल नि ते 2 वर्षांसाठी वैध असणार आहे..
‘या’ आहेत आणखी काही दमदार मोटारसायकल; देतात जबरदस्त मायलेज; पहा, काय आहेत खास फिचर..
ऋषभ पंतबद्दल दिनेश कार्तिकने दिली मोठी प्रतिक्रीया; म्हणाला,विकेटकीपर कारकीर्द…