Ebrahim Raisi : इराणला मोठा धक्का, राष्ट्राध्यक्ष रायसी यांचा मृत्यू

 Ebrahim Raisi : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्याला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळला होता. या दुर्घटनेमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यासह परराष्ट्र मंत्री होसेन यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

 बचाव पथकाने रेड क्रेसेंटच्या हवाल्याने सांगितले की, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर सापडले आहे, तथापि, रेड क्रेसेंटने इतर लोकांची स्थिती काय आहे याबद्दल माहिती दिली नाही.

रेड क्रिसेंट बचाव पथक हेलिकॉप्टरच्या अपघातस्थळी पोहोचल्याची माहिती अल जझीराने दिली होती. तत्पूर्वी, तुर्कीयेच्या शोधात असलेल्या ड्रोनला अझरबैजानच्या टेकड्यांवर एक जळणारी जागा सापडली होती. यानंतर तेथे शोध पथक पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. घनदाट जंगल आणि डोंगर असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला. इराण सरकारने शोधकार्यासाठी 40 पथके तयार केली होती.

शोधासाठी ड्रोन पाठवण्यात आले

अनादोलू या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानने राष्ट्राध्यक्ष रायसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या शोध मोहिमेत मदत करण्यासाठी ड्रोन पाठवले होते. एजन्सीने जारी केलेल्या ड्रोन फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी एका टेकडीवर काळ्या खुणा दिसत होते.

माहितीसाठी, अध्यक्ष रायसी, परराष्ट्र मंत्री होसेन, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमती, तबरीझचे इमाम मोहम्मद अली अलेहाशेम, एक पायलट, सहवैमानिक, क्रू प्रमुख, सुरक्षा प्रमुख आणि अंगरक्षक याशिवाय आणखी काही लोक हेलिकॉप्टरमध्ये होते.

Leave a Comment