Bhiwandi Lok Sabha : भिवंडीत बंडखोरी? काँग्रेस अडवणार शरद पवार गटाची वाट; पहा, काय घडलं?

Bhiwandi Lok Sabha Constituency :  शरद पवार गटाने काल उमेदवारांची दुसरी (Bhiwandi Lok Sabha Constituency) यादी जाहीर केली. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha) बजरंग सोनवणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी जाहीर होताच बंडखोरीचे चिन्ह दिसू लागली आहेत. कारण भिवंडी मतदारसंघातून नाराज असलेल्या नेत्यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर भिवंडी मतदारसंघात सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु बाळ्यामामा म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील काही नेते नाराज झाले आहेत आणि त्यांच्याकडून आता बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.

Sharad Pawar NCP : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; बीडमध्ये पंकजांविरुद्ध ‘या’ उमेदवाराला तिकीट

Bhiwandi Lok Sabha

त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी घोषित होताच पत्रकार परिषद घेतली आणि भिवंडी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेस पक्षाला कोकण विभागात जागावाटपात एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. काँग्रेस पारंपरिक असलेल्या कोकण प्रांत व भिवंडी मतदारसंघातून आता हद्दपार होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसचे अस्तित्व या मतदारसंघात राहावे यासाठी श्रेष्ठींनी आता मला मैत्रीपूर्ण लढतीचे आदेश द्यावेत. काँग्रेस श्रेष्ठींनी जर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी अर्ज भरील, असा इशारा दयानंद चोरघे यांनी दिला.

Bhiwandi Lok Sabha

या मतदारसंघात महायुतीने कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. कपिल पाटील हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा बरेच दिवस सुरू होती. जागावाटपात हा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला गेला असल्याने त्यांच्याकडून कोण उमेदवार निश्चित केला जातो याची उत्सुकता होती. अखेर शरद पवार गटाने काल सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना तिकीट दिले.

Ahmednagar Loksabha Election 2024 | तर विखे पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण? उठू लागल्या ‘त्यांच्या’ वावड्या

यानंतर म्हात्रे यांनी पुढील नियोजनास सुरुवात केली आहे. परंतु सुरुवातीलाच त्यांना काही अडचणी जाणवू लागल्या आहेत. यामागे काँग्रेसचे दयानंद चोरघे यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी करून जर ही बंडखोरी शमवली गेली नाही तर या मतदारसंघात मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment