Bhavna Gavli : अखेर महायुतीकडून यवतमाळ मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा झाली आहे. महायुतीने खासदार भावना गवळी यांचा तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भावना गवळी गेल्या पंचवीस वर्षापासून खासदार आहे मात्र यावेळी महायुतीकडून त्यांचा तिकीट कापण्यात आला आहे.
महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजश्री पाटील यांनी मतदारसंघात सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने आणि सर्वत्र सकारात्मकता दिसत असल्याने विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली.
तसेच भावना गवळी मला लहान बहीण समजून मला समजून घेतील आणि या निवडणुकीत मला योग्य मार्गदर्शन करतील. भावना गवळी महायुतीचे वरिष्ठ नेत्या आहे. माझ्यासाठी मार्गदर्शक आहे.
तर विरोधकांवर टीका करत त्यांनी ही लढाई फक्त राजश्री पाटील किंवा संजय देशमुखची नसून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला विश्वगुरू बनवण्याचे अस्तित्वाची लढाई आहे. यामुळे विजय निश्चित आमचं होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.