Bharat Jodo Yatra: Mumbai: पुढच्या महिन्यात काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या उद्देशाने पक्षाच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. याबाबतीत सोमवारी त्यांची भेट झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे (Udhav Thakre) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे काँग्रेसचे (Congress) निमंत्रण स्वीकारले आहे. राज्य काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आणि शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली.
या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, पक्षनेते विश्वजित कदम, युवा नेते सूरज ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड (Nanded) जिल्ह्यातून महाराष्ट्रात दाखल होणार असून या यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने (Congress delegation) दोन्ही नेत्यांना निमंत्रण दिले आहे.
भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद
भारत जोडो यात्रेला देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठींबा मिळत असून, दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतो आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यात्रेत सहभागी होण्यास सहमती दिल्याने त्याचे महत्व अधिक वाढले आहे.
भारत जोडो यात्रेस ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडू येथून सुरुवात
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेअंतर्गत ३५७० किलोमीटरचे अंतर १५० दिवसांत कापायचे आहे. याची सुरुवात तामिळनाडूमध्ये ७ सप्टेंबर रोजी झाली आणि जम्मू-काश्मीरमध्ये समारोप होईल. ही यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. ही पदयात्रा आतापर्यंत तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), कर्नाटक (Karnataka) आणि आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) गेली आहे.
- हेही वाचा:
- Health Issue: बापरे! व्हिडिओ गेममुळे मुलांवर होऊ शकतो गंभीर परिणाम; संशोधनात धक्कादायक खुलासा
- Agriculture News: अबब…दिवाळीत महागाईचा धक्का! ग्राहकांच्या खिशाला बसू शकते अधिकची झळ
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
यात्रेत सहभागी नेत्यांना ‘भारत यात्री’ असे नाव
काँग्रेस पक्षाने राहुल यांच्यासह ११९ नेत्यांची नावे ‘भारत यात्री’ अशी ठेवली आहेत, जे पदयात्रा काढत काश्मीरला जाणार आहेत. ही यात्रा त्यासाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास काँग्रेसला वाटतो. यात्रा सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने सर्व समविचारी राजकीय पक्ष आणि संघटनांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.